राकट, दणकट तरीही चारचौघांत उठून दिसणारी.. ऑफ रोड ड्रायिव्हगची पॅशन असलेल्यांच्या पसंतिक्रमात अग्रस्थानी असलेली फोर्ड एन्डेव्हर एसयूव्ही आता नव्या स्वरूपात सादर होणार आहे. आगामी सणासुदीच्या हंगामाचा मुहूर्त साधत ही नवी एसयूव्ही भारतात दाखल होणार आहे. त्यानिमित्ताने आगामी एन्डेव्हरचा घेतलेला आढावा..

एक तपापूर्वी फोर्ड एन्डेव्हर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने एन्डेव्हर ही सात आसनी एसयूव्ही भारतीय बाजारात प्रथम आणली. अल्पावधीतच लोकप्रियता मिळवणाऱ्या या एसयूव्हीने वरच्या वर्गात एक स्टेटस सिम्बॉल म्हणून ओळखही प्रस्थापित केली. मात्र, त्यानंतर आलेल्या टोयोटा फॉच्र्युनरने एन्डेव्हरला मागे टाकून तिचे स्थान पटकावले. तेव्हापासून एन्डेव्हरची लोकप्रियता घसरणीला लागली, तरी आजही एसयूव्हीप्रेमींच्या मनात एन्डेव्हरविषयी मायेचा ओलावा आहेच.भारतीय बाजारपेठेत आपले स्थान पुन्हा प्राप्त करण्यासाठी एन्डेव्हर आता नव्या स्वरूपात सादर होणार आहे. संपूर्ण आशिया-पॅसिफिक क्षेत्रात एव्हरेस्ट म्हणून ओळखली जाणारी एन्डेव्हर भारतात मात्र एन्डेव्हर म्हणूनच ओळखली जाणार आहे. तिला नवी झळाळी देण्यासाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका व आग्नेय आशियातील तज्ज्ञांनी अथक प्रयत्न केले आहेत.

बाह्य़रूप
जुन्या एन्डेव्हरच्या बॉक्सी संरचनेच्या अगदी उलट नव्या एन्डेव्हरचे रूप आहे. नवीन संरचना अत्यंत सुरेख, मोहक, नावीन्यपूर्ण आणि तरुणाईला अधिकाधिक आकर्षति करणारी आहे. फोर्डच्या ठेवणीनुसार समोरच्या बाजूला ट्रेपझोडियल आणि ह्य़ुमंगस ग्रिल देण्यात आले आहे. आकाराने मोठी वाटत असली तरी कव्‍‌र्ही व्हील आच्रेस आणि मोठी चाके यामुळे नवी एन्डेव्हर रांगडी आणि ताकदवान दिसते. एलईडी डे टाइम रिनग लाइट, हायलायटेड स्कीड प्लेट्स, मस्क्युलर फेण्डर्स व बूट लीडवरील क्रोम गाíनश यामुळे एन्डेव्हरला रांगडे रूप प्राप्त झाले आहे. रेखीव स्वेप्टबॅक हेडलाइट, स्टायलिश फ्रण्ट बम्पर अंडरगार्ड, हलकीशी उतरती रूफ लाइनअप, स्वेप्ट विण्डोलाइन, मागील बाजूला नवीन टेलगेट माऊण्टेड स्पॉयलर, बूट लिड माऊण्टेड नंबरप्लेट होल्डर ही काही नव्या रूपाची ठळक वैशिष्टय़े आहेत.

ऑफ रोडर
ऑफ रोड ड्रायिव्हगची हौस असणाऱ्यांना नवी एन्डेव्हर अजिबात निराश करणार नाही. ऑफ रोिडग सुलभ व्हावे यासाठी नव्या एन्डेव्हरला फोर व्हील ड्राइव्ह देण्यात आले आहे. रेंज रोव्हरप्रमाणेच एन्डेव्हरमध्येही ऑफ रोिडगसाठी स्नो, मड, ग्रास, सँड, रॉक व नॉर्मल असे विविध मोड्स देण्यात आले आहेत. तसेच अत्याधुनिक हिल डिसेंट कंट्रोल, हिल लाँच असिस्ट, लो रेंज गीअर बॉक्ससहित अ‍ॅक्टिव्ह ट्रान्स्फर केस, इलेक्ट्रॉनिकली लॉकिंग रिअर डिफरन्शिअल आदी सुविधाही आहेत.

अंतरंग
गाडीचा दरवाजा उघडताच एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे नव्या एन्डेव्हरचा अंतर्गत भाग हा पूर्वीपेक्षा अधिक उच्च दर्जाचा आहे. डॅश बोर्डच्या वरील भागास उच्च प्रतीच्या मुलायम लेदरचे आवरण असून त्यावर दुहेरी शिवणीचा वापर करण्यात आला आहे.

एसी व्हेन्ट्सला क्रोम गाíनश असून त्यांना सॅटिनचे अस्तर देण्यात आले आहे.

थ्री स्पोक इलेक्ट्रिक स्टीअिरग मल्टिफंक्शनल असून चालकाच्या सोयीनुसार ते वर आणि खाली करता येते. त्याचबरोबर चालकाचे सीटही इलेक्ट्रिकली पॉवर्ड कुठल्याही उंचीच्या आणि आकाराच्या चालकास योग्य ती ड्रायिव्हग पोझिशन मिळण्यास सोयीस्कर होते.

नव्या एन्डेव्हरमध्ये फोर्डने नव्याने विकसित केलेल्या सिंक दोन या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ब्लूटूथ स्ट्रीिमग आणि कनेक्टिव्हिटीबरोबरच व्हॉइस कमांडचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

नव्याने रचना करण्यात आलेल्या इन्स्ट्रमेण्ट क्लस्टरमध्ये अ‍ॅनालॉग स्पीडोमीटरच्या दोन्ही बाजूस दोन टीएफटी स्क्रीन्स बसवण्यात आल्या आहेत. एका स्क्रीनवर मनोरंजनाचे पर्याय आणि फोन फंक्शन दिसून येतात, तर दुसऱ्या स्क्रीनवर इंधन, तापमान, मायलेज इ. बाबी दाखवल्या जातात. त्याचबरोबर अँगल ऑफ रोल, अँगल ऑफ पीच, पुढील चाकं किती अंशाने वळली आहेत, अशी ऑफ रोिडगसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी माहिती दाखवली जाते.

सेंटर कन्सोलवर नेव्हिगेशन आणि इतर मल्टिमीडिया फंक्शन्ससाठी आठ इंच टच स्क्रीन डिस्प्ले देण्यात आलेला आहे.

एल्बो बॉक्ससमोरच दोन रबर कोटिंग असलेले कप होल्डर्स देण्यात आले असून दरवाज्यात बॉटल होल्डर्स आहेत.

सीटच्या तीन रांगांपकी पहिल्या रांगेतील इलेक्ट्रॉनिकली पॉवर्ड आहेत. दुसऱ्या रांगेतील आसने मॅन्युअली पुढेमागे करता येतात आणि दुमडता येतात. तृतीय रांगेतील आसने अ‍ॅडजस्टेबल नसले तरी ते दुमडता येतात.

सुरक्षा
ब्लाइंड स्पॉट मॉनिटिरग सिस्टम

अ‍ॅक्टिव्ह/सेल्फ पार्क असिस्ट

रेअर व्ह्य़ू कॅमेरा आणि सेन्सॉर

क्रुझ कंट्रोल

हिल डिसेंट आणि क्लाइम्ब कंट्रोल

एअर बॅग्ज, चालक नी एअरबॅग

ऑटोमॅटिक प्रोजेक्टर हेडलाइट आणि वायपर

ट्रॅक्शन कन्ट्रोल

स्टॅबिलिटी कन्ट्रोल

रोल स्टॅबिलिटी कन्ट्रोल

ए.बी.एस.

इंजिन व तांत्रिक बाबी

नव्या एन्डेव्हरमध्ये दोन इंजिनांचा पर्याय आहे.

३.२ डय़ूराटॉर्क ५ सिलेंडर टबरे डिझेल

२.२ डय़ूराटॉर्क ४ सिलेंडर टबरे डिझेल

या रंगांमध्ये उपलब्ध

कूल व्हाइट

ब्लॅक मिका मेटॅलिक

सिल्व्हर अ‍ॅल्युमिनिअम

मेटॅलिक
स्पार्कलिंग गोल्ड मेटॅलिक

रेड सनसेट मेटॅलिक.

प्रमुख प्रतिस्पर्धक

टोयोटा फॉर्चुनर

आगामी शेव्रोले ट्रेलब्लेझर

आगामी मित्सुबिशी पजेरो स्पोर्ट

अपेक्षित किंमत

२३ ते २९ लाख रुपये

अपेक्षित लाँचिंग

दिवाळीदरम्यान

सर्वेश वैद्य
ls.driveit@gmail.com