श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करण्यात येतो आहे. त्यामुळेच यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या मूर्तीसाठी तब्बल ४० किलो सोन्याचे दागिने तयार करण्यात आले आहेत. मागील १५ वर्षांत देणगी स्वरुपात जमा झालेल्या सोन्यापासून हे दागिने तयार करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात बाप्पाच्या मूर्तीला घालण्यात येणारे दागिने मंगळवारी लक्ष्मी रोडवरील गाडगीळ ज्वेलर्समध्ये ठेवण्यात आले होते. हे दागिने पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Abhinay berde lakshmikant berde
“मागे लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा फोटो पाहिला अन्…”, अभिनय बेर्डेसाठी क्षितीज पटवर्धनची पोस्ट; म्हणाला, “बरीच मुलं वारसा घेतात, याने…”
Govinda, Maval, Shrirang Barne,
पिंपरी: श्रीरंग बारणेंसाठी अभिनेता गोविंदा सरसावला! केला बारणेंचा प्रचार
LSG Assistant Coach Sreedharan Sriram on Mayank Yadav
LSG vs RR : राजस्थानविरुद्ध वेगवान गोलंदाज मयंक यादव खेळणार की नाही? एलएसजीचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणाले…
Ipl 2024 chennai super kings face lucknow super giants for second time
IPL2024 : लखनऊसमोर चेन्नईचे आव्हान

गणेश मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले की, यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव असल्यामुळे हे नवीन दागिने घडविण्यात आले. यात हत्ती शिल्प, मोरतुरे आणि नवग्रहांच्या समावेशासह ७ ते १० हजार खडयांची सजावट असलेला ९.५ किलोचा मुकुट, रत्नजडित खडयांनी तयार केलेला ७०० ग्रॅमचा शुंडहार, सूर्याच्या किरणांचा आभास निर्माण करणारे २ किलो वजनाचे कान आणि तब्बल ४ हजार सुवर्णटिकल्यांनी मिनाकाम करुन चंद्रकोरीचा आभास निर्मिती करणारा २.५ किलोचा अंगरखा बाप्पाला अर्पण करण्यात येणार आहे. पु. ना. गाडगीळ यांच्याकडील ४० कारागिरांनी या दागिन्यांसाठी ५ महिन्यांपासून मेहनत घेतली. या कारागिरांची मजुरी तब्बल सव्वा कोटी रूपये होती. मात्र कारागिरांनी मजुरी स्विकारली नसल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले