जळगाव जिल्ह्य़ातील पूर्व खान्देशातील नामवंत कृषितज्ज्ञ, तत्त्वचिंतक डॉ. देवरामभाऊ नारखेडे यांनी १२ मार्च १९५२ साली, धरणगाव तालुक्यातील साळवा या गावात ‘ग्राम सुधारणा मंडळा’ची मुहूतमेढ रोवली. याच संस्थेची ‘साळवे इंग्रजी विद्यालय साळवे’ ही एक आदर्श शाळा. साळवे इंग्रजी विद्यालय शाळा म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे श्रद्धास्थान.
शाळेत मराठी तसेच अर्ध-इंग्रजी माध्यमातून अध्यापन केले जाते. दररोज शाळा सुरू होण्यापूर्वी सकाळी इंग्रजी व गणिताचे मोफत मागदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांचे वक्तृत्वकौशल्य, भाषिककौशल्य जोपासले जाते. याशिवाय निबंध स्पर्धा, कथाकथन, पाठांतर स्पर्धा, समूहगीत गायन, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा होतात. डिसेंबर महिन्यात आंतरशालेय क्रीडा स्पर्धा होतात. या वेळी क्रीडा अधिकारी यांच्यासमोर विद्यार्थ्यांचे क्रीडा संचलन व विविध क्रीडा प्रकारांचे प्रदर्शन होते. यामुळे विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण जोपासले जातात.
सानेगुरुजी व्याख्यानमाला आयोजित केली जाते. यातून संस्कारक्षम गोष्टी सांगितल्या जातात. दररोज प्रार्थनेच्या वेळी परिपाठ होतो. यात विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी विपस्यनाअंतर्गत आनापान साधनेच्या दैनंदिन सरावामुळे मुलांमध्ये एकाग्रता, मनाची जागृतता व सतर्कता वाढते. स्वयंशासन आत्मविश्वास वृद्धिंगत होतो, राग, चीड, भीती, उदासिनता कमी होते.
शाळेत एक मूल व एक झाड हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. यातून शालेय परिसर हिरगावार, निसर्गसंपन्न झाला आहे. शाळेत रोपवाटिका तयार झाली आहे. यातून रोपांचे वाटप मोफत केले जाते. यामुळेच शाळेला राज्य सरकारचा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. शाळेत दर बुधवारी प्रत्येक वर्गाचा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जातो. त्याचप्रमाणे २६ जानेवारी या दिवशी एकत्रित सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे विविध कलांचा आविष्कार विद्यार्थी पालकांसमोर करतात. विविध सणांचे (उदा.: मकरसंक्रात, रक्षाबंधन इ.) औचित्य साधून प्रेम, आपुलकी, जिव्हाळा मैत्रीची भावना जोपासली जाते. शाळेत प्रत्येक शनिवारी विविध कवायत प्रकार व योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली जातात. परिपाठाला विद्यार्थ्यांचे वाढदिवस मुख्याध्यापकांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन साजरे केले जातात.
शाळेत शैक्षणिक व भौतिक सुविधांची काही कमतरता नाही. सुसज्ज प्रयोगशाळा जिथे विद्यार्थी स्वत: प्रयोग करतो, २० संगणकांनी सुसज्ज असा संगणक कक्ष आहे. त्यात इंटरनेटसह, एल.सी.डी. प्रोजेक्टर बसवला आहे. याद्वारे संगणकीय ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होते. शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शाळेत दत्तक घेतले जाते व त्यांच्या गरजांकडे लक्ष पुरवले जाते. विविध व्याख्यात्यांची व्याख्याने आयोजित केली जातात.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय परीक्षांव्यतिरिक्त सराव परीक्षा घेतल्या जातात. विविध विषयांतील तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यामुळेच शाळेचा निकाल ८०% वरून ९४% पर्यंत पोहोचला आहे. पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शाळा सुटल्यावर इंग्रजी, गणित विषयांचे पाठांतर घेतले जाते. या सर्व उपक्रमांमुळे परिसरात ही शाळा उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते.

कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही असे ‘चिरंतन शिक्षण’ देणारे उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी. संपर्कासाठी पत्ता- ‘चिरंतन शिक्षण’ लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट,            
मुंबई-४०००२१. दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७  
reshma.murkar@expressindia.com,  reshma181@gmail.com

vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
jarag nagar municipal corporation school
कोल्हापुरातील जरग नगरातील शाळेसाठी पालकांची सायंकाळपासूनच रीघ; महापालिकेच्या शाळा प्रवेशाचे अनोखे चित्र!
Fire Breaks Out at Atharva Agrotech Industry Project in Buldhana near khamgaon midc
खामगाव ‘एमआयडीसी’तील ‘अथर्व ॲग्रोटेक’ला भीषण आग, लाखोंची हानी
Hasan Mushrif
आम्हालाही प्रत्युत्तर द्यावे लागेल – हसन मुश्रीफ यांचा कोल्हापुरातील ‘मविआ’ला इशारा