मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
अभ्यासक्रमाच्या तुलनेत अध्यापनासाठी मिळालेल्या अपुऱ्या वेळेमुळे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र यापैकी कोणत्याही विषयाला न्याय देऊ शकलो नसल्याची सार्वत्रिक भावना बारावीच्या शिक्षकांमध्ये आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या या हतबलतेचे सर्वाधिक बळी अर्थातच क्लासला जाऊ न शकणाऱ्या ग्रामीण भागात आढळून येतील. आपल्या अध्यापनाविषयी शिक्षकांमध्येच आत्मविश्वास नसल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांची अवस्था यंदा 'आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून' अशी झाली आहे.
बारावी विज्ञानाच्या रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र या विषयांच्या सुधारित अभ्यासक्रमाचा आवाका खूप मोठा आहे. त्यातल्या त्यात रसायनशास्त्राने तर विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांच्या तोंडालाही फेस आणला आहे. प्रत्येक विषयासाठी नेमून दिलेल्या तासिकांमध्ये तर हा अभ्यासक्रम संपविणे बिलकूल शक्य नाही. पण, पूर्वपरीक्षेआधी संपूर्ण अभ्यासक्रम संपवायचा म्हणून अनेक महत्त्वाचे धडे घाईघाईत उरकल्याची भावना विज्ञानाच्या सर्वच शिक्षकांमध्ये आहे. परिणामी आम्हीच आमच्या अध्ययनाविषयी समाधानी नाही, अशी प्रतिक्रिया मिठीबाई महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विषयाचे प्रा. मयूर मेहता यांनी दिली.
याला अपवाद मे, दिवाळीच्या अथवा आठवडी सुट्टीत जादा तास घेऊन मुलांची तयारी करवून घेणाऱ्या काही महाविद्यालयांचा. पण, अशी कनिष्ठ महाविद्यालये महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतकीच आहेत. उर्वरित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अध्यापनाच्या दृष्टीने बोंब आहे. बारावीला विज्ञानाच्या एका विषयासाठी दर आठवडय़ाला तीन तासिका दिल्या जातात. मात्र, सुधारित अभ्यासक्रम इतका आहे की हा वेळ अभ्यासक्रम संपविण्यास पुरेसा नाही, अशी प्रतिक्रिया नांदेडच्या यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. एस. बी. चव्हाण यांनी व्यक्त केली. या महाविद्यालयात बारावीबरोबरच नीट, एचएचटी-सीईटी, जेईई आदी सामायिक प्रवेश परीक्षांसाठी लातूर पॅटर्नच्या धर्तीवर विद्यार्थ्यांकडून विशेष तयारी करवून घेतली जाते.
दरवर्षी सुमारे ६०० विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय विशेष वर्ग घेते. पुढील वर्षी बारावीला येणारे विद्यार्थी अकरावीला असतानाच महाविद्यालय बारावीचा अभ्यासक्रम शिकविण्यास सुरुवात करते. बारावीचे वर्ष सुरू होतानाच म्हणजे जून-जुलैपर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवून पूर्ण होतो. पुढील महिने पाठांतर, सराव, प्रश्नपत्रिका सोडविणे, शंका निरसन यासाठी दिला जातो. यावर्षीही महाविद्यालयाने आदल्या वर्षी डिसेंबरपासूनच बारावीचे वर्ग सुरू केले. मात्र, या वर्षी अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत सप्टेंबर उजाडला, असे डॉ. चव्हाण सांगतात. मे महिन्याची, दिवाळीची, आठवडी सुट्टी न घेता हा अभ्यासक्रम पूर्ण केला गेला. यात अभ्यासक्रमाच्या कर्तव्यपूर्तीतून मुक्त झाल्याची भावना असली तरी शिकविण्याचे समाधान नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दिवसरात्र, सुट्टीची तमा न बाळगता एका ध्येय्याने प्रेरित होऊन शिकविणाऱ्या महाविद्यालयात ही स्थिती आहे, तर उर्वरित महाविद्यालयांमध्ये ती किती गंभीर असेल याची कल्पनाच न केलेली बरी. वाढीव अभ्यासक्रमाचा हा बोजा पेलण्यासाठी अध्यापनामध्ये पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन, स्लाईड शो आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा. जेणे करून गणित किंवा रसायनशास्त्रातील टेबल्स किंवा समीकरणे फळ्यावर लिहिण्यासाठी लागणारा वेळ वाचेल, अशी सूचना त्यांनी केली. विज्ञानाच्या महत्त्वाच्या विषयांच्या पेपरमधील दिवसांचे अंतर वाढविल्यास विद्यार्थ्यांना किमान सरावासाठी तरी वेळ मिळेल, अशी भावना प्रा. मेहता यांनी व्यक्त केली. (क्रमश:)




















माझा लहान भाऊ मागच्या महिन्यापासून हे सांगत होता पण मी लक्ष नाही दिले… पण जेव्हा लोकसत्ता सारखे दैनिक सलग २ दिवस या विषयावर बातमी देते तेव्हा पालकांना माझ्या पालकांनासुद्धा हे पटले जर अभ्यासक्रम सबसे चा तर वेळापत्रक का नको? मंडळाने यावर काही केले पाहिजेच
DEAR लोकसत्ता धन्यवाद !!!!
15 lakh kutumbacha awaj jaga karnyas madat karnyache punya karma लोकसत्ता kartoy.
Sarjerav and HSC board jage honar aahe ka?
Mala watate te adelttattu aahet. Tyana kon samjavnar?
Kiman HSC Timetable tari badalale tari barich relief poranla milel..Yattun kharech komal mananchya mulanchya vyatha jagasamor yetayet.
Deva sarjerav ani company la sadbudhi devun (timetable) Vela patrakat pudhil pramane badal karanyachi kripa kar.
Jar 10 marchala raviwari Chemistry chi pariksha ani 17 marchala raviwari Maths chi pariksha thevali tar kahi aunshi taan Kami hoil. Ya vishayacha saamana लोकसत्ताच karu shakato.
Shikashak Mahasangha sudha yala pathimba deyeel. Khare tar tyanhi ya purvich hi magni 4 mahinyanpurvi Sarjerav ani company kade keli hoti. Pan Sarjerav Aaiknar ka?
प्रिय लोकसत्ता धन्यवाद !!!!
15 lakh कुटुंबाचा आवाज जागा करण्यास मदत करण्याचे पुण्य कर्म लोकसत्ता करतोय .
सर्जेराव आणि HSC board जागे होणार आहे का?
मला वाटते ते adelttattu आहेत . त्यांना कोण समजावणार? किमान HSC वेळापत्रक जरी बदलले तरी बरीच relief पोरांना मिळेल. यातून खरेच कोमल मनांच्या मुलांच्या व्यथा जगासमोर येतायेत.
देवा सर्जेराव आणि कंपनी ला सद्बुद्धी देवून (timetable) वेळापत्रकात पुढील प्रमाणे बदल करण्याची कृपा कर.
जर 10 मार्चला रविवारी चेमिस्त्र्य ची परीक्षा आणि 17 मार्चला रविवारी maths ची परीक्षा ठेवली तर काही अंशी पोरांचा ताण कमी होईल .
या विषयाचा सामना लोकसत्ताच करू शकतो. शिक्षक महासंघ सुधा याला पाठींबा देईल. कारण त्यांनी हा विषय तर या पूर्वीच हाती घेतला होता अशी माझी माहिती आहे. त्यांच्या सूचनांचा विचार करन्यास HSC बोर्डला का कमीपणा वाटतो कळत नाही. खरे तर त्यांही या पूर्वीच हि मागणी 4 महिन्यांपूर्वी सर्जेराव आणि बोर्ड/कंपनी कडे केली होती. पण सर्जेराव ऐकणार का?
देवा त्यांना सद्बुद्धि दे!!!