‘महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे’चे वार्षिक अधिवेशन शनिवारी (९ फेब्रुवारी) परळच्या दामोदर नाटय़गृहात होणार आहे. माजी शिक्षण संचालक श्रीधर साळुंखे या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शाळांना वेतनेतर अनुदान तातडीने द्यावे, शिक्षक-शिक्षकेतर भरतीवरील बंदी तातडीने उठवावी, मोफत व सक्तीच्या शिक्षणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी यासह अनेक ठराव या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते, पुणे विभागाचे आमदार भगवानराव साळुंखे, परिषदेच्या अध्यक्षी संजीवनी रायकर, यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करतील. दरम्यान, शनिवारी होणारी सर्व शिक्षा अभियानाची प्रशिक्षणे पुढे ढकलण्यात आली आहेत, अशी माहिती संघटनमंत्री अनिल बोरनारे यांनी दिली.