लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणारे सागर कस्टम हाऊस हे मोबाइलचे दुकान अज्ञात चोरटय़ांनी फोडले. सोमवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमध्ये सुमारे १० लाखांचे किमती ८० मोबाइल लंपास केले.

सागर सुरेश घोसळकर यांच्या मालकीचे बिंदू चौक ते माईसाहेब बावडेकर पुतळय़ाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सागर कस्टम नावाचे मोबाइलचे दुकान आहे. रविवारी रात्री दुकानाचे मॅनेजर मिलिंद जनार्दन नाईक यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेले होते. सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी ते आले असता दुकानाचे शटर उचकटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आत जाऊन पाहिले असता दुकानातील नामांकित कंपन्यांचे किमती मोबाइल नसल्याचे दिसून आले. मिलिंद नाईक यांनी घोसाळकर तसेच लक्ष्मीपुरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

tbo tek sets price band at rs 875 to 920 per share
टीबीओ टेकची प्रत्येकी ८७५ ते ९२० रुपयांना भागविक्री
environmentalist initiative to fill dry water bodies for wildlife
उरण : वाढल्या उन्हाच्या झळा, वन्यजीवांसाठी भरला पाण्याचा तळा
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
in Nagpur, Attempted Gang Rape, Raises Concerns, Women Safety, Attempted Gang Rapein Nagpur, crime in nagpur, nagpur crime, police, nagpur news, marathi news,
गृहमंत्र्यांच्या गृहशहरात महिला असुरक्षित? भरदुपारी गँगरेपचा प्रयत्न

चोरटय़ांनी दुकानाच्या दर्शनी बाजूस असणारे शटर उचकटून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र शटर न उचकटल्याने शेजारी असणाऱ्या नीलम स्टुडिओचा लाकडी दरवाजा कडीकोयंडा उचकटून जिन्यावर प्रवेश केला. जिन्याचे पार्टिशन उचकटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. जिन्याची शेवटची पायरी चोरांनी फोडून भिंतीस भगदाड पाडले व मोबाइलच्या दुकानात प्रवेश केला.

चोरटय़ांनी चोरी करण्यापूर्वी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे बॅकअप फोडले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीची हार्डडिस्क ताब्यात घेतली. तज्ज्ञांकरवी फुटेज तपासण्याचे प्रयत्न केले, मात्र हार्डडिस्क खराब झाल्याचे दिसून आले.

बिंदू चौक परिसरात नेहमीच पोलीस बंदोबस्त असतो. रात्रीच्या वेळी या ठिकाणी गस्तीचे पोलीस थांबून असतात. पहाटे २ ते ४च्या सुमारास चोरटय़ांनी ही चोरी करून गस्तीवरील पोलिसांना आव्हान दिले आहे.