टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर रांची शहर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. धोनीने आपल्या बुलेटवर चुकीच्या पद्धतीने नंबर प्लेट लावल्यामुळे पोलिसांनी कारवाई करून त्याच्याकडून ४५० रुपयांचा दंडही वसूल केला.
कॅप्टनकूल धोनीने सोमवारी रांचीत आपल्या बुलेटवरून फेरफटका मारला. दुसऱया दिवशी
वृत्तपत्रात धोनीचे बुलेट सफारीचे चित्र प्रसिद्ध झाले. यात बुलेटवर चुकीच्या पद्धतीने नंबर प्लेट लावल्याचे आढळून आले. वाहतुकीच्या नियमानुसार गाडीची नंबर प्लेट समोरच्या बाजूला असणे आवश्यक आहे. त्यामुळे धोनीवर दंडात्मक कारवाई करण्‍यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. धोनीच्या घरी दंडाची पावती पाठवून पोलिसांनी दंडाची रक्कम वसूल केली.dhoni2