किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्याचा नाणेफेक चेन्नई सुपरकिंग्ज संघाने जिंकला असून धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई संघाकडून सलामीवीर ब्रेन्डन मॅक्क्युलम दमदार फटकेबाजी करत असून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली.
पुढे ग्लेन मेक्सवेलला मॅक्क्युलमला रोखण्यात यश आले. मॅक्क्युलम ६७ धावांवर बाद झाला परंतु, त्यानंतर ड्वेन स्मिथने आक्रमक रुप धारण करत तुफान फटकेबाजी केली आणि त्यानेही ६६ धावा ठोकून संघाच्या धावसंख्येला आकार दिला.
त्यापुढे कर्णधार धोनी आणि रैना यांनी संघाला २०० पार नेण्यास मदत केली आणि २० षटकांच्या अखेरीस चेन्नईने २०५ धावांचा डोंगर किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर उभा केला. याच्या प्रत्युत्तरात पंजाबकडून सलामीवर ग्लेन मॅक्सवेलने तुफान फलंदाजी करत ४२ चेंडुत ९५ धावा ठोकल्या. त्यानंतर कर्णधार जॉर्ज बेली आणि डेव्हिड मिलर यांनी धावसंख्याची सरासरी कायम राखत २०५ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य गाठले.