MI vs KKR Highlights: वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सला सर्वबाद करत २४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआर संघ १९.५ षटकांत १६९ धावाच करू शकला. ज्यामध्ये व्यंकटेश अय्यरने ७० धावा तर मनीष पांडेने ४२ धावांचे योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ १४५ धावांवरच मर्यादित राहिला. केकेआरकडून गोलंदाजीत मिचेल स्टार्कने ४ तर आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेनने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. केकेआर संघाने या विजयासह १२ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्यात यश मिळवले आहे.

मुंबई संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने या लाजिरवाण्या पराभवानंतर वक्तव्य दिले आहे, ज्यामध्ये तो म्हणाला, “आम्ही चांगली भागीदारी करू शकलो नाही आणि सातत्याने विकेट गमावल्या, ज्याचा ट्वेन्टी२० मध्ये फटका बसतो. मनात खूप सारे प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरं मिळायला वेळ लागेल. पण आता बोलण्यासारखं माझ्याकडे फार काही नाही. गोलंदाजांनी खरोखरचं चांगली कामगिरी केली, पहिल्या डावापेक्षा दुसऱ्या डावात खेळपट्टी चांगली झाली. दवही आलं. यानंतर आम्ही आणखी काय चांगलं करू शकतो याचा विचार करू. संघर्ष करत राहणं हे माझं काम आहे, मी नेहमी स्वतला हेच सांगत असतो. आव्हानं येत राहणार, संघर्ष करत राहीन.”

Nepal fan jumps into swimming pool Video viral in BAN vs NEP match
तौहीद हृदोयच्या विकेटनंतर नेपाळी चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, स्विमिंग पूलमध्ये उडी मारल्याचा VIDEO व्हायरल
Disappointment of Pakistani fan who sold tractor video viral
IND vs PAK सामना पाहण्यासाठी पाकिस्तानच्या चाहत्याने विकला ट्रॅक्टर, भावुक होत सांगितली व्यथा, VIDEO व्हायरल
Azam Khan got out on golden duck in USA vs PAK
USA vs PAK : ‘गोल्डन डक’वर आऊट झाल्यानंतर आझम खान संतापला, चाहत्यांशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
New York pitch not settled according to Rohit Sharma
IND vs IRE : “मला वाटते की खेळपट्टी अद्याप…”, रोहित शर्माने न्यूयॉर्कच्या ‘ड्रॉप इन पिच’ व्यक्त केली नाराजी
Hardik Pandya breaks his silence
T20 WC 2024 : घटस्फोटाच्या चर्चांवर आणि कठीण परिस्थितीवर हार्दिक पंड्याने सोडले मौन; म्हणाला, “कधीकधी आयुष्य तुम्हाला…”
SRH Scores Lowest Total in IPL Finals
IPL 2024 Final: KKR च्या गोलंदाजांचा तिखट मारा अन् SRH ची सपशेल शरणागती, हैदराबादच्या नावे IPL इतिहासातील लाजिरवाणा विक्रम
IPL code of conduct breach by Shimron Hetmyer
SRH vs RR : शिमरॉन हेटमायरला ‘ती’ चूक पडली महागात, बीसीसीआयने केली मोठी कारवाई
Virat Kohli emotional post on Instagram
IPL 2024 : विराटची राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर भावनिक पोस्ट; RCB च्या चाहत्यांचे आभार मानत म्हणाला…

या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने १० सामन्यांत ७ विजय मिळवून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यांचे १४ गुण आहेत. केकेआर प्लेऑफमध्ये पोहोचण्यापासून काही पावले दूर आहे. तर मोठ्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे ११ पैकी ३ विजय आणि ८ पराभवानंतर केवळ ६ गुण मिळवले आहेत आि संघ गुणतालिकेत ९व्या स्थानावर आहे.