केनिया आणि पूर्व व मध्य आफ्रिका फुटबॉल संघटनांनी  सेप ब्लाटर यांच्या फिफा अध्यक्षपदाला पाठिंबा दर्शविला आहे. फुटबॉल केनिया महासंघ (एफकेएफ) नेतृत्व करीत असलेल्या या तिन्ही संघटनांच्या अध्यक्षपदावर सॅम न्यामवेया असून ते सध्या ज्युरिच येथे फिफा काँग्रेससाठी आहेत. त्यांनीच ब्लाटर यांना पाठिंबा दर्शविला असून आपल्या निर्णयात बदल न करण्याचा प्रवित्रा त्यांनी घेतला आहे.
‘‘या भ्रष्टाचाराच्या कारवाईआधीच आम्ही ब्लाटर यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला होता. त्यामुळे या निर्णयात बदल करण्याचा कोणताही विचार नाही,’’ असे एफकेएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘जगभरातील फुटबॉलमध्ये वादविवाद सुरू आहेत, केनियातही तसे वाद आहेत. त्यामुळे परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असलेली व्यक्तीच यात टिकून राहू शकते.’’

सेप ब्लाटर यांनी अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे. फिफाची प्रतिमा पुन्हा सुधारण्यासाठी हाच एक पर्याय आहे. त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा किंवा निवडणुकीतून माघार घ्यावी किंवा आम्ही तिसरा पर्याय शोधू.
– ग्रेग डिक, इंग्लिश फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष

या प्रकरणामुळे फिफाच्या मुळाशी भ्रष्टाचार रुजले असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
– युईएफए

या कारवाईमुळे फिफामधील भ्रष्टाचार नाहीसा होईल, अशी आशा करणे चुकीचे ठरणार नाही. ब्लाटर यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
– रोमारिओ,  माजी फुटबॉलपटू