भूतानमध्ये होणारी ‘टूर ऑफ ड्रॅगन’ सायकल स्पर्धा ही ‘डेथ रेस’ म्हणून ओळखली जाते. नाशिकचे सायकलपटू डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र महाजन हे दोन भाऊ आणि त्यांच्या समवेत किशोर काळे हे तिघेजण ‘डेथ रेस’ मध्ये सहभागी होणार आहेत. २६ ऑगस्टला ते कठीण अशा शर्यतीत सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहेत. हिमालयाचे अद्भुत निसर्ग आणि कठीण वातावरणाची, चढ-उतार असलेले खडकाळ आणि मातीचे रस्ते यांची अनुभूती देणारी स्पर्धा दि. २ सप्टेंबर रोजी होत आहे.भूतान ऑलिम्पिक कमिटीयांच्याद्वारे ही ‘टूर ऑफ ड्रॅगन’ सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या सायकलपटूस १ लाख ५० हजाराचे पारितोषिक देण्यात येते. २०१५ मध्ये अमेरिकेतील ‘रेस अॅक्रॉस अमेरिका’ पूर्ण केल्यानंतर डॉ. महाजन बंधुंनी भारतात आयोजित करण्यात आलेली गोल्डन क्वाड्रीलेटरल शर्यत पूर्ण केली होती. त्यानंतर ते पुन्हा एकदा’डेथ रेस’ मध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. २०१२ मध्ये या रेसमध्ये सहभागी झालेल्या डॉक्टर बंधूंपैकी महेंद्र महाजन यांनी शर्यत पूर्ण केली होती. मात्र डॉ. हितेंद्र यांना ही शर्यत वेळेत पूर्ण करता आली नव्हती. यावेळी या दोन बंधूसोबत  नाशिकचे सायकलपटू किशोर काळे सुद्धा स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

Nagpur, bus, re-tendering,
फेरनिविदेऐवजी मुदतवाढीचा पर्याय! नागपूर महापालिकेची चलाखी; १३०० कोटींचे बस खरेदी प्रकरण
sarkari naukri nhpc recruitment 2024
NHPC Recruitment 2024 :कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती सुरू; ३० एप्रिलपूर्वी करा अर्ज
WAPCOS Engineer Recruitment or Bharti For 275 Various Posts Check selection process and important details
WAPCOS Recruitment 2024: इंजिनियर्ससाठी नोकरीची संधी! ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू; ‘असा’ करा अर्ज
Mahindra Bolero Neo Plus SUV launch
Force Citiline, Gurkha 5-door विसरुन जाल! टोयोटानंतर आता महिंद्राने देशात दाखल केली ९ सीटर SUV कार, किंमत…

डॉ. महेंद्र महाजन म्हणाले की, हिमालयीन पर्वतरांगांत होणारी ही जगातील सर्वात कठीण अशी स्पर्धा आहे. एका दिवसात सलग ४० किमीपेक्षा जास्त अंतराचे ३ घाट पार करायचे असतात. वारंवार येणारे मोठे चढ आणि उतार सायकलपटूंसाठी कसोटी असते. कडाक्याची थंडी, उंच ठिकाणी ऑक्सिजनचे बदलते प्रमाण, पावसामुळे वाहून गेलेले रस्ते अशातून अविश्रांत सायकल चालवत एका दिवसात स्पर्धा पूर्ण करावी लागते. त्यामुळे हे सर्व आव्हानात्मक असते. २०१२ मध्ये सहभागी झालो होतो, त्यावेळी सायकलिंगमध्ये आम्ही नवखे होतो. केवळ मनाशी ठरवले आणि स्पर्धेत सहभागी झालो. कोणतेही तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नव्हते. मात्र यावेळी २०१७ मध्ये आम्ही तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन सहभागी होत असल्याने विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करण्याचा मानस आहे. पहिल्यांदाच अशा शर्यतीमध्ये सहभागी होणाऱ्या किशोर काळे यांनी नाशिक सायकलपटू जसपाल सिंग यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही शर्यत पूर्ण करणार असल्याचे सांगितले. जसपाल सिंग आपल्यात असताना ते नेमही विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करण्याविषयी बोलत होते. मात्र आज ते आपल्यात नाहीत. त्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ‘टूर ऑफ ड्रॅगन’ पूर्ण करणार असल्याचे काळे म्हणाले. नाशिक सायकललिस्ट संघटनेच्या सदस्यांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले.

काय आहे नेमकी ‘टूर ऑफ ड्रॅगन?’
सायकलपटूंनी ‘डेथ रेस’ असे टोपण नाव दिलेली ही स्पर्धा एका दिवसात पूर्ण करायची असते. २६८ किमी अंतर, समुद्र सपाटीपासून १२०० मीटर ते ३३४० मीटर अशी उंची, हिमालयीन पर्वतरांगांतून ४० किमीपेक्षा जास्त लांबीचे तीन घाट ओलांडत पूर्ण करावी लागणारी ही जगातील सर्वात कठीण एकदिवसीय सोलो सायकल स्पर्धा आहे. ‘टूर ऑफ ड्रॅगन’ शर्यत आजवर खूप कमी सायकलपटूंना पूर्ण करता आली आहे.

प्रचंड थंडीत मध्य भूतानमधील बमथांग येथून दि. २ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजता सुरु होणाऱ्या या स्पर्धेसाठी सायंकाळी ६ वाजताचा कट ऑफ असतो. म्हणजेच एकूण १६ तासात २६८ किमी अंतर या अवघड पर्वतीय रांगांमधून पूर्ण करावे लागते. एका मोजणीनुसार प्रत्येक सायकलपटूंच्या एका दिवसाच्या या शर्यतीदरम्या सरळ रेषेत ३७९० मीटर (१२४३४ फुट) चढून ३९५० (१२९५९ फुट) उतरून येण्याची कसरत सायकलपूटंना करावी लागते. भूतानची राजधानी थिम्फू शहरात ही स्पर्धा संपते.