गेल्या वर्षांच्या शेवटाला गौरी शिंदे दिग्दर्शित डिअर जिंदगीया चित्रपटाची बरीच चर्चा होती. या चित्रपटातील प्रकर्षांने लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे आलिया भट्टने रंगवलेल्या पात्राचं हटके प्रोफेशनसिनेमॅटोग्राफी. प्रत्यक्षात मुलगी सिनेमॅटोग्राफर असणं ही बाब अनेकांच्या भुवया उंचावून जाते. पुरुषांचं वर्चस्व असणाऱ्या या करिअरमध्ये घट्ट पाय रोवण्याचं धाडस दाखवलंय एका मराठमोळ्या मुलीनं. स्वत:च्या आवडीचं करिअरमध्ये रूपांतर करताना अपूर्वाला काय काय अनुभव आले हे तिच्याच शब्दांत..

अपूर्वा शाळिग्राम

माझ्या परिवारात बॉलीवूड किंवा चित्रपट क्षेत्राशी संबंधित असं कोणीच नव्हतं. त्यामुळे हे क्षेत्र जितकं माझ्यासाठी नवीन होतं तितकंच माझ्या परिवारासाठीदेखील नवीन होतं. मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयामधून मानसशास्त्राची पदवी घेतल्यानंतर मी व्हिसलिंग वूड्समधून एक वर्षांचं सिनेमॅटोग्राफीचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं. त्यानंतर मला ‘युनिसेफ’कडून नोकरीची ऑफर आली आणि माझा या क्षेत्रामध्ये एका व्यावसायिक पातळीवर प्रवास सुरू झाला. पण इथपर्यंतचा प्रवास अगदी सोपा नव्हताच. मुळात या क्षेत्रात करिअर करावं हे ठरवण्याच्या आधी बारावीनंतर हौस आणि आवड म्हणून मी फोटोग्राफी शिकले होते. माझे बाबा सामाजिक कार्य करत असल्याने विविध स्वयंसेवी संस्थांसाठी निधी उभारण्याकरता मी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित करत. मी काढलेला एका पॉकेट वॉचचा फोटो गीतकार स्वानंद किरकिरे यांच्या नजरेत आला आणि त्यांना तो इतका आवडला की,माझं त्यांनी तोंडभरून कौतुक केलं. एका सेलेब्रिटीकडून असे कौतुकाचे शब्द ऐकताना तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा असं वाटलं की, मी फोटोग्राफीच्या क्षेत्रात काही तरी करायला हवं. कॅमेरा आणि छायाचित्रांच्या प्रेमापोटी मी छोटय़ा मोठय़ा शॉर्ट फिल्म्स बनवल्या. त्यादरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर हअश्ए संस्थेने मला एक वर्षांची फेलोशिप दिली. महाराष्ट्रातून त्या वेळी मी एकटीच मुलगी होते. राज्याचं प्रतिनिधित्व करत होते.

माझ्या आई-बाबांनी मला माझ्या या पूर्ण प्रवासात फार मोलाची साथ दिली. मुळात या क्षेत्रात मुलांचं प्रमाण जास्त आहे. अगदी बोटावर मोजण्याइतक्या मुली इथे काम करतात. त्यामुळे अशा ठिकाणी निभाव लागताना घरच्यांचा विश्वास महत्त्वाचा असतो, ते मानसिक आधार देतात. व्हिसलिंग वूड्सच्या ट्रेनिंगनंतर आईच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी एक वर्षांची गॅप घेतली. माझ्यासोबतचे या क्षेत्रातले माझे मित्र काम करत होते आणि मी आईसाठी घरी होते. पण मला माझ्या कलेवर विश्वास होता आणि आईची सेवा करायला मिळणं हीदेखील समाधानाची बाब होतीच. सिनेमॅटोग्राफीचं काम तसं भटकंतीचं. हेक्टिक. माझ्या आईने तेव्हा ‘तू एडिटिंग किंवा लिखाण का करत नाहीस? सिनेमॅटोग्राफीत पुरुषांचं वर्चस्व आहे, तर तू हे का करतेयस?’ असे प्रश्न उपस्थित केले, सल्ले दिले. पण माझं काम आणि मला यातून मिळणारा आनंद तिला कळला तेव्हा आता तीदेखील समाधानी आहे. तिची काळजी आता कमी झाली आहे. माझे आई-बाबा वगळता माझा बाकीच्या परिवाराला माझ्या कामाची तितकीशी माहिती नाहीये.

गेल्या तीन वर्षांत मी अनेक मोठय़ा डीओपींसोबत काम केलं (डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी ऊडढ) जाहिराती आणि म्युझिक व्हिडीओजसोबतच चित्रपटांसाठीदेखील मी काम केलं आहे. मराठीत ‘फोटोकॉपी’, हिंदीतील ‘तलाश’, ‘रईस’ अशा चित्रपटांसाठी मला काम करायला मिळालं.ो्र१२३ अउ (फर्स्ट असिस्टंट कॅमेरा) म्हणून काम करणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. मनोज खटोई आणि के. मनमोहन यांच्या सोबत मी बरंच काम केलंय आणि खूप गोष्टी फार लक्षपूर्वक शिकून घेतल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून मी स्वतंत्र काम करते आहे आणि सिनेमॅटोग्राफर ते ऊडढ असा प्रवास मी साधला आहे.

मी माझ्या खाजगी आयुष्यात अवखळ मुलगी आहे, मात्र सेटवर एक सिनेमॅटोग्राफर/ ऊडढ या नात्याने मुलगी असूनही तिथल्या लोकांची मी लेफ्ट राइट परेड करवते.

मुलगी असल्याने या क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. या क्षेत्रात कामाला प्रचंड वाव आहे, संधी आहेत पण ती मिळाल्यावर तिचं सोनं करता आलं पाहिजे. कित्येकदा काम नसताना किंवा एखादा प्रोजेक्ट संपला किंवा पुढचा प्रोजेक्ट मिळेपर्यंतचा काळ आव्हानात्मक असतो. ‘आपण चुकीचा मार्ग तर निवडला नाही ना?’, ‘आता पुढे काय?’ असे प्रश्न पडतात. मग त्या वेळेस संयम ठेवणं, परिवाराची साथ मिळणं या गोष्टी फार महत्त्वपूर्ण ठरतात. एखाद्या मराठी मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये मुलींकडून ज्या अपेक्षा असतात त्याच अपेक्षा माझ्या आई-बाबांच्यादेखील आहेत. पूर्वीपासूनच मित्रपरिवारांत मुली कमी आणि मुलं जास्त आहेत. अगदी व्हिसलिंग वूड्समध्ये असताना वर्गात मी एकटीच मुलगी होते. त्यामुळे मैत्रीण नाही. माझं क्षेत्र असं आहे की जिथे मुलांशीच जास्त संबंध असतो. मला दागिन्यांची विशेष आवड नाहीये पण केवळ मुलाने पसंती दाखवावी म्हणून आईने एका समारंभात नाकात नथ घालायला लावली आहे. असे प्रसंग येतातच. आयुष्यात कामामुळे असे अनेक क्षण येतात जेव्हा मलाही वाटतं की, कोणी तरी असावं ज्याच्यासोबत मी आनंद, दु:ख, ताण असं सगळं वाटू शकेन. पण क्षेत्र असं असल्याने मला अशा व्यक्तीच्या शोधात आहे जो माझ्यासोबत माझ्या कामालादेखील मनापासून आपलंसं करून समजून घेईल. माझ्या क्षेत्रात स्थिरता नाहीये याची मला पूर्ण कल्पना आहे, पण हे माझं काम मला या जगात सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि त मला सगळ्यात जास्त आनंद देतं. आयुष्यात पिक्चर परफेक्ट असं काही नसतं, हेदेखील या करिअरच्या निमित्ताने माझ्या लक्षात येतंय.