कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, पण कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करणारे जनुकीय उपचार विकसित करण्यात आले आहेत. यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण निम्म्याने कमी होते. आरएनए इंटरफिअरन्स थेरपी असे या तंत्राचे नाव असून त्यात कोलेस्टेरॉल वाढीस कारणीभूत ठरणारी जनुकीय कळ बंद केली जाते. ब्रिटनमधील लंडनच्या इंपीरियल कॉलेजच्या संशोधकांनी याबाबत चाचण्या घेतल्या असून वर्षांतून दोनदा ही उपचार पद्धत वापरल्यास कोलेस्टेरॉल कमी होते. यात स्टॅटिन औषधांवर अवलंबून राहावे लागत नाही. जनुकीय उपचार पद्धतीत इनक्लिसिरान हे औषध वापरले जाते. त्यामुळे हृदयविकार, पक्षाघात टाळता येतो कारण त्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होत असते. ही उपचार पद्धती साधी सोपी व सुरक्षित आहे असा दावा इंपिरियल कॉलेजच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्रा. कौशिक रे यांनी केला आहे. स्टॅटिन, एझेटेमाइब या औषधांनी कोलेस्टेरॉल जेवढे कमी होते. त्यापेक्षाही ते यात जास्त प्रमाणात खाली येते. एलडीएल हे वाईट कोलेस्टेरॉल मानले जाते. ते वाढल्यास हृदयविकार व रक्तवाहिन्या अवरुद्ध होतात. सध्या कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी स्टॅटिन औषधे वापरली जातात. पण अनेक रुग्ण त्याचे जास्त प्रमाण सहन करू शकत नाहीत. इनक्लिसिरान औषध मात्र चाचण्यात यशस्वी ठरले असून त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. ४९७ रुग्णांवर त्याचे प्रयोग केले असता तीन महिन्यात चांगला फरक दिसून आला. एका महिन्यात एलडीएलचे प्रमाण ५१ टक्के कमी झाले.

Gulab jamun milkshake viral video
गुलाबजाम, साखरेचा पाक, आइस्क्रीम अन्… सोशल मीडिया व्हायरल होतोय ‘डायबिटिक मिल्क शेक’ पाहा हा Video
temperature affect the battery of mobile phones
विश्लेषण : तुमच्या स्मार्टफोनचीही बॅटरी ‘स्लो’ झालीय? हा  कडक तापमानाचा परिणाम असू शकतो…
cigarette, cigarette ban, Britain,
विश्लेषण : ब्रिटनची वाटचाल संपूर्ण सिगारेटबंदीकडे… काय आहे नवा धूम्रपान बंदी कायदा?
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या