लठ्ठपणा किंवा स्थूलता ही सध्याच्या काळातील एक मोठी समस्या आहे. वाढते फास्ट फूडचे सेवन, खाण्याच्या अयोग्य सवयी अशा अनेक कारणांमुळे वजनावर नियंत्रण आणणे कठीण होते आणि कित्येक वेळा उंचीनुसार नेमके किती वजन असावे याबद्दल साशंकता निर्माण होते. व्यक्तीमध्ये देश आणि तेथील वातावरणानुसार वेगवेगळ्या अवयवांवर चरबी किंवा मेद साचते. भारतीयांमध्ये अन्नातील अतिरिक्त मेद हा पोटावर साचतो. मात्र आपल्याला नेमके किती वजन कमी करायचे आहे याची काही समीकरणे आहारशास्त्रामध्ये प्रचलित आहे. त्यात शरीरभार (बॉडी मास इंडेक्स), पोट आणि कंबर याचे गुणोत्तर, त्वचेच्या घडीची जाडी अशी अनेक मोजमापे वापरली जातात. यातील शरीरभार हा लोकांमध्ये प्रचलित आहे.

शरीरभार-

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

शरीरभार या प्रकारात शरीराची उंची आणि वजन याचा समतोल कसा राखावा याची नेमकी पद्धत सांगण्यात आली आहे. उंचीनुसार वजन वाढत असले तरी प्रमाणाच्या बाहेर गेले की स्थुलता येते. यासाठी एक गुणोत्तर देण्यात आले आहे ते पुढीलप्रमाणे-

शरीरभार : व्यक्तीचे वजन(किलो) भागिले व्यक्तीच्या उंचीचा (मीटर) वर्ग. यातून आलेल्या उत्तरावरून व्यक्तीचे वजन योग्य प्रमाणात आहे की नाही हे कळते. हे तपासण्यासाठी खालील तक्ता देण्यात आला आहे.

योग्य प्रमाण : २०-२३(शरीरभार)

अधिक वजन : २४-२६

स्थूलतेची प्रथम पातळी : २७-३०

स्थूलतेची द्वितीय पातळी : ३१-३५

स्थूलतेची तृतीय पातळी : ३६ आणि यापुढील शरीरभाराच्या गुणोत्तराच्या निकालानुसार व्यक्तीचे वजन नेमके किती जास्त आहे याचा अंदाज येऊ  शकतो आणि त्यानुसार वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ  शकतात. शरीरभार ३५ च्या पुढे गेल्यावर आजाराच्या समस्या निर्माण होऊ  शकतात. मात्र काही शरीरशास्त्रतज्ज्ञांनुसार यामध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. या प्रकारात स्त्री आणि पुरुष भेद लक्षात घेतला जात नाही आणि दुसरे या प्रकारामुळे शरीरातील उष्मांक मोजता येत नाही. वयस्कर आणि लहान मुलांकरिता हे प्रमाण योग्य मानता येऊ  शकत नाही.

कंबर आणि नितंबांच्या आकाराचे गुणोत्तर-

ही पद्धतदेखील सोपी आणि प्रभावी आहे. या प्रकारात बेंबीचा वरचा घेर ज्याला पोट म्हटले जाते आणि नितंबाचा घेर मोजण्यात येतो आणि आलेल्या संख्येचा भागाकार केला जातो.

कंबरेचा घेर (सेंमी) भागिले नितंबांचा घेर (सेंमी) –

या गुणोत्तराचे उत्तर स्त्रियांसाठी ०.७ ते ०.९ असायला हवे आणि पुरुषांसाठी ०.९ ते १ असायला हवे. पोटाचा घेर हा नितंबांच्या घेरापेक्षा मोठा असू नये. असे असल्यास त्या व्यक्तीस पाच प्रकारचे जीवनशैलीजन्य आजार होऊ  शकतात. यात मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, हार्मोन्समध्ये बिघाड आदी आजार होऊ  शकतात.

बेसल मेटाबॉलिक रेट-

या प्रकारात जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टी करण्यासाठी शरीराला किती उष्मांक लागतो याचे मोजमाप केले जाते. श्वास घेणे, हृदयाची धडधड, चयापचय क्रिया या प्रक्रियेसाठीही ऊर्जेची आवश्यकता असते. झोपताना किंवा आराम करत असतानाही आपल्या शरीरातील उष्मांक कमी होत असतो. यालाच बेसल मेटाबॉलिक रेट असे म्हटले जाते. बीएमआर व्यक्तीसापेक्ष असतो. बीएमआर वाढविण्याच्या काही पद्धती आहेत, यामुळे व्यक्तीचे वजनही घटते. मात्र बीएमआर कमी असेल तर व्यक्तीचे वजन वाढेल.

* सकस आहार, प्रोटिनयुक्त पदार्थानी बीएमआर वाढू शकतो.

* फायबरयुक्त पदार्थ म्हणजे फळ, भाज्या, कोशिंबीर खाल्लय़ाने बीएमआर वाढतो.

* पाणी भरपूर प्यावे

* एकाच वेळी जेवणापेक्षा दिवसभरात थोडे थोडे अन्न घ्यावे.

 

ब्रोका निर्देशांक-

शरीरभार मोजण्याची ही पद्धत असून याचा उपयोग आदर्श पद्धत काढण्यासाठी केला जातो. या प्रकारातील गुणोत्तरात एकच आकडा येतो.

ब्रोका निर्देशांक = व्यक्तीची उंची- १००

या पद्धतीनुसार एखाद्या व्यक्तीची उंची १५० सेंमी असेल तर त्याचे आदर्श वजन ५० किलो समजावे.

कातडीच्या घडीची जाडी-

शरीरातील बरीच चरबी त्वचेखाली जमा होते. ही जाडी मोजण्यासाठी निरनिराळी मापनयंत्रे उपलब्ध आहेत. चिमटय़ाच्या आकाराच्या उपकरणाच्या साहाय्याने शरीरातील जाडी मोजता येते. यापैकी एक मापक वापरून पोटाची, खांद्याजवळील, दंडाच्या मागची आणि पुढची त्वचा, जांघेच्या वरची या सर्वाची बेरीज स्त्रियांमध्ये ४० मिमीपेक्षा आणि पुरुषांमध्ये ४० मिमीपेक्षा अधिक असू नये. मात्र चिमटय़ाच्या साहाय्याने येणारी जाडी प्रत्येक वेळी बदलू शकते, त्यामुळे यामध्ये विश्वसार्हता नसते.

डॉ. कांचन पटवर्धन, आहारतज्ज्ञ

(शब्दांकन : मीनल गांगुर्डे)