आहे का? आजच्या स्त्रियांना, मुलींना त्यांचा चॉइस काय, ते माहीत आहे का खरंच? भरकटलेले विचार घेऊन वाटचाल सुरू आहे नुसती. कळतच नाहीय त्या काय करतात ते, तर कुठला आलाय चॉइस. ७०% मुलींना त्यांचा चॉइसच नसतो, म्हणजे त्यांच्यात ती क्षमताच नाही मुळात, मग अशा वेळी इतरांचं ऐकून करावं काही तरी आणि निर्णय सोडून द्यावा वरिष्ठांवर आणि विश्वास ठेवावा त्यांच्यावर, मायेची माणसं तुमचं चांगलं व्हावं यासाठीच प्रयत्नशील असतात. मुळात जगण्याचा अर्थच कळला पाहिजे, मग ते कसं जगायचं हे ठरविता येईल नं, पण नाही, हे माहीत नाही, ते माहीत नाही, कुणी सांगितलंच नाही आम्हाला, असे मूर्खासारखे वागणे. मग कसला आलाय चॉइस.

हेही हवं तेही हवं, नाही तर मग हेही नको तेही नको, मग होणार, सर्व एकत्र मिळू शकत नाही म्हणून स्वीकारणारी पाचांना द्रौपदी, आहे का खरंच तुम्हाला तुमचा चॉइस.
स्वसंरक्षण, स्वकर्तव्य, स्वजबाबदारी, आहे का याची जाणीव, नसेल तर ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आधी, त्यातूनच पुढे येईल प्रगट होईल तुमची निवडक्षमता, सोनंही तावून निघाल्यानंतर चमकतं आणि मूल्यवान ठरतं, जीवनाची मूल्ये ओळखा. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचे मूल्य दडलेले असते.
सर्वाचाच (तुमचा) जन्मच मुळी तुमच्या चॉइसने झालेला नाही, मग जन्माला आल्यावर हा अट्टहास का व कशासाठी? त्यां विधात्यानं तुमच्यासाठी ऑप्शनच ठेवलेलं नव्हतं, तस ठेवलं असतं तर तुम्ही मानलं असतं का त्याला, त्याच्या शक्तीला.
जीवनामध्ये प्रत्येक वेळी चॉइसप्रमाणे वागता येत नाही, समोर आलेली परिस्थिती बघून ते ठरवायचं असतं, तेथे काही पर्यायच नसतो, तरीही तुमचा अट्टहास असेल ‘माझी निवड’ तर तुम्ही एकाकी व्हाल. मग जीवनमूल्यच संपून जातील. पुन्हा पश्चात्ताप, हे करायला नको होतं, असं केलं असतं तर बरं झालं असतं. पुन्हा द्विधा मन:स्थिती, वाटलं तुम्हाला की तुमच्यात आहे निवडक्षमता?
सतत अस्थिर मनोवृत्ती, चुकलं तर माझं, मी खरंच बरोबर करतेय की चुकीचं वागते. झाला का निर्णय पक्का, नाही नं? विचारतायत मैत्रिणीला, मग आईला, मग बाबांना. आहे तुम्हाला चॉइस खरचं?
मी शिकते आहे? कशासाठी?
मी नोकरी करते कशासाठी?
१) देशाची सेवा करायची
२) समाजाची सेवा करायची
३) कुटुंबाचा आधार बनायचं
४) स्वत:साठी
– पहिला ऑप्शन, छान वाटतो सांगायला. आहे तेवढी हिम्मत, त्यागाची भावना, खडतर वाटचालीची तयारी?
– दुसरा ऑप्शन पण तसाच. ग्रेट वाटतंय सांगायला, पण समाज म्हणजे, शिक्षित-अशिक्षित, उघडे-नागडे गरीब अस्वच्छ जागेत राहणारे, असंघटित गुन्हेगार मनोवृत्तीचे, या सगळय़ांचा समावेश असतो त्यामध्ये. आहे एवढय़ा सगळय़ाशी टक्कर घेण्याची हिंमत? आहे तेवढा तेवढा वेळ तुमच्याजवळ त्यांना द्यायला? त्यांची सेवा करायला? त्यांचं सगळं जाणून घेऊन निस्तरायला? निवड तुमची.
तिसरा ऑप्शन ‘कुटुंब’ ते म्हणजे फक्त नवरा-बायको, मुलं असं नव्हे, नवऱ्याचे आईवडील, बहीणभाऊ, बाकी नातेवाईक. तुमचे स्वत:चे आईवडील, बहीणभाऊ, नातेवाईक. या सर्वाचं मिळून ‘कुटुंब’ असतं, आहे याची जाणीव? की फक्त मी, माझा नवरा, माझं मूल एवढंच गृहीत धरलंय ‘कुटुंब’ या व्याख्येत? दचकलात नं? सासू-सासरे, दीर, नणंद, भाऊ-भावजय किती किती नाती जोपासावी लागतात, आहे चॉइस यातलं एक निवडण्याचा? तुम्हालाही आवडेल का यातलं एक निवडलेलं? दोन बहीणभावांमधून एकाला निवड म्हटलं तर काय कराल? स्वत:च्याच मुलांमधून, विधात्यानं ऑप्शन न देता एकाच वेळी दोन दिलेत तुम्हाला, तर एकाला निवडाल का माय चॉइस म्हणून.
– चवथा ऑप्शन स्वत:साठी जगायचं, मग चॉइसचा प्रश्नच कुठे येतो. एकमध्ये चॉइस नसतोच कधी, एकटेच राहणार असाल तर सगळं शून्य. करा काय ते. नो चॉइस.
कपडय़ांची चॉइस, हेअरस्टाइल, मेकअपची चॉइस, फिरणे-मस्ती करणे याची चॉइस? अनेक मित्र की एक मित्र ही चॉइस? हे सगळं जीवनातल्या फक्त एकाच टप्प्यातलं आहे आणि ती धुंदी आहे त्या टप्प्यातली, जीवनातल्या बाकी टप्प्यांत काय? विचार केलाय. नाहीच येणार तसा विचार डोक्यात, कारण तुम्ही तरुण आहात, फक्त आत्ताचा, आजचा विचार, पुढे काय? पश्चात्ताप. तेव्हा चॉइसला ऑप्शनच नसतात मुळी, सगळं संपलेलं, शून्य.
मी धुंदीत होते ज्याच्या
स्वप्न की आभास तो
वेळीच सावरले ज्याने
आईचा श्वास होता तो..

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?