कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे (कोमसाप) दरवर्षी देण्यात येणाऱ्या १५ वाङ्मयीन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, प्रसिद्ध लेखक अशोक समेळ, स्टीफन परेरा, शशिकांत तिरोडकर इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे.
मुंबईत होणाऱ्या कोमसापच्या संमेलनात येत्या २२ नोव्हेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. पाच हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
विविध वाङ्मय प्रकारातील पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे – कादंबरी-र. वा. दिघे स्मृती पुरस्कार – अशोक समेळ (मी अश्वत्थामा चिरंजीव), कथासंग्रह – वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार – स्टीफन परेरा (पोपटी स्वप्न), कविता – आरती प्रभू पुरस्कार – शशिकांत तिरोडकर (शशिबिंब), चरित्र – आत्मचरित्र – धनंजय कीर स्मृती पुरस्कार – मोहन गोरे (आनंद यात्रा), ललित गद्य – अनंत काणेकर स्मृती पुरस्कार – नीला सत्यनारायण (टाकीचे घाव), बालवाङ्मय – प्र.श्री.नेरुरकर स्मृती पुरस्कार – डॉ. विद्याधर करंदीकर (नाथ पै-असाही एक लोकनेता), संकीर्ण वाङ्मय – वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार – डॉ. गोपीनाथ सारंग (झाकोळलेले प्राचीन कोकण), दृकश्राव्यकला, सिनेमा- भाई भगत स्मृती पुरस्कार – दिवाकर गंधे (चित्रगंध), नाटक, एकांकिका – रमेश कीर पुरस्कार – विनोद पितळे (बाय द वे).
या व्यतिरिक्त द्वितीय क्रमांकाचे विशेष पुरस्कार पुढीलप्रमाणे – कादंबरी – वि. वा. हडप स्मृती पुरस्कार – प्रा. चंद्रकांत मढवी (उधळ्या),
कथासंग्रह – विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार – मनीष पाटील (माह्य़वाल्या गोष्टी), कविता – वसंत सावंत स्मृती पुरस्कार – रेखा कोरे (वास्तवाच्या उंबरठय़ावर), चरित्र-आत्मचरित्र – श्रीकांत शेटय़े स्मृती पुरस्कार – डॉ. भगवान कुलकर्णी (ऑनरेबली अ‍ॅक्विटेड), ललित गद्य- सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे पुरस्कार – रेखा नार्वेकर (आनंद तरंग), संकीर्ण वाङ्मय – अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार – डॉ. विद्या जोशी (आरोग्यासाठी मनाचे श्लोक). तीन हजार रुपये रोख, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून कोमसापच्या संमेलनात त्यांचे वितरण केले जाणार आहे.