‘१ मे’ हा महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय विदर्भवाद्यांच्या बैठकीत झाल्याची माहिती श्रीहरी अणे यांनी दिली. ‘१ मे’ला सर्व विदर्भवादी संघटना मिळून स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवणार असल्याचेही अणेंनी सांगितले. स्वतंत्र विदर्भाच्या भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर अणे पत्रकारांशी बोलत होते. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून यापुढे आमच्यावर हल्ला झाला तर प्रतिकार करू, शांत बसणार नाही, असा इशारा अणेंनी यावेळी दिला. मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरें यांच्यासोबत चर्चा करून त्यांना वेगळ्या विदर्भाचे महत्त्व पटवून द्यायला तयार आहे. यासंदर्भात मी बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही चर्चा केली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी आम्ही विदर्भाचा विकास करू शकलो नाही तर स्वत:हून विदर्भ स्वतंत्र करू, असे आश्वासन दिले होते, असे सांगितले.

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस: जनतेला दरवेळी मूर्ख बनवता येत नाही
Loksatta anvyarth Two years The war in Ukraine began Russia numerical superiority
अन्वयार्थ: नुसते लढ म्हणा..?
farmer protest
गुन्हा दाखल झाल्यावरच अंत्यसंस्कार! शुभकरनच्या मृत्यूमुळे संतप्त शेतकऱ्यांचा ‘काळा दिवस’
Mohammad Hafeez Reveals About Babar
Mohammad Hafeez : ‘तुम्ही म्हणजे पूर्ण संघ नाही…’, हाफिजने बाबर आझमला असं का म्हटलं होतं? स्वतःच केला खुलासा