डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित केंद्रीय युवा महोत्सवांतर्गत रविवारी दुसऱ्या दिवशी सादर झालेल्या विविध कलाविष्कारांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लोककला प्रकारांसह एकांकिका, प्रहसन, वादविवाद, समूह गायन, लोकनृत्य, आदिवासी नृत्य आदी कलाप्रकार कलाकारांनी सादर केले. नाटय़गृहात मिमिक्री, प्रहसन, एकांकिका, शास्त्रीय नृत्य, मूक अभिनय वगैरे स्पर्धा पार पडल्या. लोकोत्सवात भजन, भारुड, लोकवाद्यवृंद, वासुदेव, पोवाडा हे कलाप्रकार सादर झाले. ललित कला विभागात सकाळी रांगोळी स्पर्धेत ८४ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले. 14yuvaनिसर्ग दृश्य, भारतीय संस्कृती व भारतीय उत्सव असे विषय या साठी होते. विविधतेत एकता हे सूत्र गुंफताना विविध धर्मामधील उत्सवाची ओळख सुबक रांगोळीतून घडविण्यात आली. दुपारी पोस्टर स्पर्धेत ४२ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले. स्त्री भ्रूणहत्या, राष्ट्रीय एकात्मता व स्वच्छ भारत हे विषय या साठी होते.
शब्दांगण रंगमंचावर शनिवारी वादविवाद स्पर्धा रंगली. यात ‘राज्य सरकारने जाहीर केलेले दुष्काळी पॅकेज शेतकरी आत्महत्या थांबविण्यात यशस्वी ठरेल का’ हा विषय होता. यात ६२ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदविला. ग्रामीण भागातून आलेल्या स्पर्धक वि14yuva6द्यार्थ्यांनी अत्यंत पोटतिडकीने या विषयावर आपले विचार मांडले. याच रंगमंचावर सादर झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत ७८, तर काव्यवाचनात ७२ संघांनी सहभाग घेतला. डॉ. सुधाकर शेंडगे व प्रा. आनंद देशमुख यांनी या मंचाचे संयोजन केले.
महोत्सवात ४ जिल्ह्य़ांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. महोत्सवांतर्गत विद्यापीठ परिसर स्वच्छ राहावा, या साठी जागोजागी स्वच्छतेचे संदेश लावले आहेत. लोकोत्सव रंगमंचावर आयोजित भारूड स्पर्धेत ४१ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला. प्रा. राजकुमार इंदूलकर व प्रा. विनोद जाधव यांनी याचे संयोजन केले.