टेलिव्हिजन अभिनेत्री मौनी रॉयचे सौंदर्य सर्वांनाच मोहित करणारे आहे. नेहमीच नवनवीन स्टाईलमध्ये दिसणाऱ्या मौनीचा ‘बंगाली लूक’मधला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ‘बंगाली ब्युटी’ मौनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटात ती भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी मौनी या बंगाली लूकमध्ये दिसतेय.

या फोटोमध्ये लाल आणि काळ्या रंगाच्या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. पारंपरिक बंगाली केशरचना आणि केसांत लाल गुलाब विशेष लक्ष वेधून घेतोय. मुख्य म्हणजे या फोटोंमध्ये तिच्या कपाळावर सिंदूर पाहायला मिळतोय. अभिनेत्री स्कार्लेट विल्सनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. ‘गोल्ड’ चित्रपटाच्या सेटवरील या फोटोंमध्ये पारंपरिक बंगाली वेशभूषेत मौनी अत्यंत सुंदर दिसतेय.

https://www.instagram.com/p/BWkIW4LgQ7y/

वाचा : घराणेशाहीचा झेंडा मिरवणाऱ्यांमध्ये प्रसारमाध्यमेच अग्रेसर- सैफ 

रीमा कगटी यांचा हा चित्रपट पुढील वर्षी ऑगस्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. काही दिवसांपूर्वी खिलाडी कुमारच्या फॅन क्लबने चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो ट्विटरवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये अक्षय कुमार धोती कुर्तामध्ये स्मितहास्य करताना दिसतोय. एकंदरीत पारंपरिक वेशांतील दोघांचे फोटो पाहता चित्रपटात बंगाली पार्श्वभूमी दाखवण्यात येईल असे दिसतेय.

https://www.instagram.com/p/BWmsrwsgC6w/

बॉलिवूड पदार्पणात अक्षय कुमारसोबत भूमिका साकारण्यासाठी मौनी खूपच उत्सुक आहे. याआधी ती सलमान खानचा भावोजी आयुश शर्मासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. मात्र नंतर ही चर्चा खोटी ठरली आणि अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटात मौनीला संधी मिळाली.