”अगं कुठे होतीस तू? तुला कधीपासून शोधतेय मी. क्लासमध्ये नाही, कँटीनमध्ये नाही आणि आता इकडे कट्ट्यावर बसून काय करतेस?” कँम्पसमधून प्राची धावत आली.

”आग लागली आहे का कुठे? एवढं काय झालंय शोधायला मला?” केतकीने विचारलं.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: १२ वर्षांनी शतक तरीही सेलिब्रेशन नाही, रोहित शर्माचा सामन्यानंतरचा व्हीडिओ चाहत्यांना करतोय भावुक
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?

प्राचीला ती पुरेपूर ओळखत होती. राईचा पर्वत कसा करायचा हे तिच्याकडून शिकायचं. कॉलेजची डॉन होती प्राची. ग्रुपमध्ये सगळेच तिला ‘प्राची’ सोडून ‘प्राची भाई’ असेच हाक मारायचे. मानेपर्यंत कापलेले केस, टी-शर्ट आणि नेहमी इथून तिथून फाटलेल्या बॉय फ्रेंड जिन्स घालून  प्राची कॉलेजला यायची. पाठीवर बॅग, एका हातात कडी, बँड, मोठं घड्याळ आणि पायात शूज. फॅशन कशाशी खातात हे तिला माहितीच नव्हतं. इतर मुलींसारखी ती नव्हती, मेकअप सोडाच ती कधी केस तरी विंचरते का? अशीच सगळ्यांना शंका होती. टॉम बॉय होती प्राची. पण मनाने खूपच चांगली होती. ग्रुपमध्ये कोणालाही काही अडचण आली की प्राचीच धावून जायची, ग्रुपमधल्या सगळ्यांचे सिक्रेट प्राचीला माहिती होते. म्हणजे कॉलेजमध्ये कोणाला कोण आवडतं, कोणाची सेटिंग लावायची… सगळं प्राचीच करायची. प्राची सगळ्यांची बेस्ट फ्रेंड असली तरी तिची मात्र केतकीच बेस्ट फ्रेंड होती.

तर केतकी प्राचीच्या पूर्णपणे विरुद्ध होती. हुशार होती त्यामुळे ग्रुपमध्ये सगळेच तिला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असंच चिडवायचे. केतकी फॅशनेबल होती. अभ्यासाबरोबरच कधी, कुठे काय स्टाईल सुरू आहे हेही तिला माहिती होतं. एखादा फॅशन ट्रेंड आला आणि त्या ट्रेंडचे कपडे, अॅक्सेसरिज केतकीकडे नसले तर नवलच. सेमी कर्ली केस, प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग नेलपेंट, मॅचिंग अॅक्सेसरिज, स्टाईलिश बॅग असं तिचं सारं काही परफेक्ट असायचं. कॉलेजमधल्या इतर हुशार मुलींसारखी केतकी अजिबात नव्हती. अभ्यास पण करायचा आणि मजा पण करायची तिचा जगण्याचा फंडा. कॉलेजमधले अनेक सिनिअर मुलं तिच्या मागे मागे करायचे. केतकीही सगळ्यांचं अटेंशन एन्जॉय करायची.

”अग आता बोलणार आहेस.. का शोधत होतीस मला?”, केतकीने प्राचीच्या गळ्यात हात घालून विचारलं.

”अगं काही नाही सहज, बाय द वे आज एकदम टवका दिसतेय” प्राची म्हणाली.

”विषय फिरवू नकोस, आता सांगतेय का काय झालंय ते?”

”तू हसणार नाहीस तर सांगते”‘

”बरं बाबा सांग लवकर, पुढचं लेक्चर सुरू होणार आहे”

”मग जाऊ दे, जा तू लेक्चरला” प्राचीचा चेहरा पडला

”बरं बंक करू लेक्चर बस”

”आता सांग, काय झालंय? माझ्यासाठी प्रपोजल पाठवलंय का कोणी?” केतकीने हसत विचारलं.

”नाही मीच प्रपोज करणार आहे” प्राची अगदी हळू आवाजात बोलली.

”काय?” केतकी जोरात ओरडली, कट्ट्यावरचे सगळेच तिच्याकडे पाहू लागले.

”तू अशी रिअॅक्ट करणार असशील तर अजिबात सांगणार नाही मी”

”एक मिनिट तू काय म्हणालीस? तू प्रपोज करणार आहेस? कोणाला?” केतकीच्या चेहऱ्यावरच आश्चर्य लपत नव्हतं.

”तू प्रॉमिस कर की तू हे कोणालाच सांगणार नाही.”

”ok”

”केतकी मला एक मुलगा आवडतो!”, प्राची लाजत म्हणाली.

कॉलेजच्या तीन वर्षांत पहिल्यांदाच केतकीने प्राचीला लाजताना पाहिलं असेल. हे ऐकूनच केतकी जोरात हसायला लागली. डोळ्यात पाणी येईपर्यंत केतकी हसली, शेवटी तिचं लक्ष प्राचीकडे गेलं, प्राचीचा चेहरा रडवेला झाला होता.

”झालं हसून, मला वाटलं अख्ख्या कॉलेजमध्ये तूच माझी बेस्ट फ्रेंड  आहे म्हणून मी तूलाच सांगितलं आणि तू..”
प्राची उठून चालायला लागली.

”अग अग थांब थांब” केतकीला वाईट वाटलं, ती प्राचीच्या मागे धावत गेली.

”सॉरी बाबा, मला असं नाही वागायला हवं होतं, पण तू आणि प्रेम.. कधी वाटलं नव्हतं, म्हणून हसायला आलं.”, केतकी प्राचीला मनवत होती.

”बरं सांग, कसा आहे माझा जिजू. आपल्या कॉलेजमधला आहे का?” केतकीने विचारलं.

”ए जिजू काय?” प्राची रागावली.

”बरं मग काय डॉन म्हणू?”

”तू ना केतकी तुला सांगायलाच नको होतं.” प्राची वैतागली.

”अगं मस्करी करतेय ग, एवढंही कळत नाही का तुला? तू आणि ग्रुपमधले बाकीचे कसे ग मला ज्याच्या त्याच्या नावाने चिडवत असतात. आता मला चान्स मिळाला तर मी का सोडू? सांग कोण आहे तो?”

”रोहित त्याचं नाव”

”कोण तो थर्ड इअरला आहे तो रोहित का गं?”

”नाही, आपल्या कॉलेजमधला नाहीय तो. ते बाजूला मुलांचं इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे ना तिथे शिकतो.”

”व्वा एकदम इंजिनिअर पटवलास हा तू?” केतकीने विचारले.

”पटवला नाही, मी म्हणाले मला तो आवडतो.” प्राची केतकीला अर्थ समजावून सांगत म्हणाली.

”फोटो दाखव चल आता” केतकीने उत्सुकतेने विचारले.

प्राचीसारखी मुलगी कोणाच्या प्रेमात पडलीये हे बघण्याची तिला फारच उत्सुकता होती.

”केतकी तू माझी चांगली मैत्रिण आहे ना? मग माझ्यासाठी एक काम करशील का?”

”अरे एक कशाला १० करेन, तेरे लिए तो जान भी दे देंगे हम” प्राचीला मिठी मारत ती म्हणाली.

”जीव वगैरे नको, तू त्याला जाऊन विचार ना एकदा की त्याला मी आवडते का ते?”

”मी कसं विचारू? मी त्याला ओळखत नाही. कधी त्याला भेटलेही नाही, तो कोण कसा आणि त्याला थेट तुझ्याबद्दल विचारू? सॉरी बॉस तू दुसरं काहीतरी सांग” केतकीने सरळ हात वर केले.

”हे बरंय, तुमच्या सगळ्यांचे प्रपोजल घेऊन मी जाते ना? ग्रुपमधल्या सगळ्यांच्या जोड्या जुळवल्यात मी. आणि आता माझी वेळ आली तर तू मदत पण नाही करत आहेस. हीच तुझी दोस्ती” प्राची रागात म्हणाली.

”ओके सांग, काय करायंच ते? आता नको मी नंतर सांगते काय करायचं ते? चल आता कँटीनमध्ये जाऊ बाकीचे वाट बघत असतील.” केतकी आणि प्राची बॅग घेऊन निघाल्या.

”ओके बाय द वे मुलाचं पूर्ण नाव काय आहे?” केतकीने विचारले. तिची उत्सुकता लपत नव्हती. फेसबुकवर असला तर फोटो तरी बघता येईल, केतकीने विचार केला. प्राचीनेही नाव सांगितले. केतकीने आपला फोन काढला आणि फेसबुकवर नाव शोधू लागली. पुढच्या मिनिटाला तिला रोहितची प्रोफाईल दिसलं. प्राची म्युच्युअल फ्रेंड दिसत होती. म्हणजे हाच तो रोहित असणार. केतकीने प्रोफाईल पाहिलं पण प्रिझ्मा इफेक्टमध्ये फोटो होता, तिला काही तो नीट दिसला नाही. जाऊ दे असेल कोणीतरी हिच्यासारखा म्हणत ती प्रोफाईलमधून बाहेर पडली. रोहितचे पुढचे एकही फोटो तिने पाहिले नाही.

दुसऱ्या दिवशी प्राची कॉलेजमध्ये आली तीच मुळी डोक्यात काहीतरी प्लान घेऊन. ती केतकीला शोधत होती. नेहमीप्रमाणे कट्ट्यावर बसलेली केतकी तिला दिसली.

”केतकी तुला सांगितलं होतं ना मी रोहितबद्दल. आता तुला काय करायचं तेही मी सांगते.”

केतकीला मुळात या सगळ्यात पडण्यात काहीच इन्ट्रेस्ट नव्हता, पण प्राचीसाठी तिला नाईलाजाने करावे लागत होतं.

”तू त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवं आणि मग मेसेजवरून विचार ना त्याला” प्राची म्हणाली.

”प्राची तुलाही माहितीय मी अनोळखी व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत नाही. त्यातून मेसेज पाठवण्याचा प्रश्नच नाही” केतकीने ऐकूनच नकार दिला.

”अग राणी, रोहित खूप चांगला मुलगा आहे, तू फक्त विचार त्याला प्लीज, प्लीज. बघ मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. तू एवढं पण नाही करू शकत का माझ्यासाठी?” प्राची केतकीला इमोशनल ब्लॅकमेल करत होती.

”ओके” केतकी पुढे शेवटी पर्याय नव्हता. तिने फेसबुकवरून रोहितला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.

रोहितला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तीन दिवस झाले होते. त्याने अजूनही रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली नव्हती. प्राचीसारखी केतकीला प्रश्न विचारून विचारून छळत होती. शेवटी चौथ्या दिवशी रोहितने फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली. केतकीला नोटिफिकेशन आले, थोड्याच वेळात तिचा फोन वाजला. रोहितचा मेसेज होता. ”सॉरी, आपण एकमेकांना ओळखतो का?”

रोहितही खूप साधा होता, तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. इतर मुलांसारखं त्याला मुलींशी मैत्री वाढवण्यात अजिबात रस नव्हता. तसा तो थोडा लाजराही होता. कोणत्याही मुलीशी मर्यादेत वागायचे, ती बोलायला आलीच तर बोलायचं असं रोहितचं होतं. त्या दिवशी केतकी सारख्या सुंदर मुलीची रिक्वेस्ट आल्यावर तो बावरलाच. त्याच्या कॉलेजच्या शेजारी असणाऱ्या कॉलेजमध्ये ती शिकत होती. एवढी सुंदर मुलगी स्वत:हून आपल्याला रिक्वेस्ट का पाठवेल, त्याला कळतच नव्हतं. प्राचीची ती म्युच्युअल फ्रेंड दिसत होती. प्राचीनेच तिला आपल्याबद्दल सांगितलं असणार त्याच्या डोक्यात विचार आला म्हणूनच त्याने फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली नव्हती. शेवटी त्याने चार दिवसाने ती स्विकारली आणि केतकीला मेसेज केला.

”नाही, तू मला ओळखत नाही, पण मी तुला ओळखते.” केतकीने लगेच मेसेज केला.

”ओ, कशी?” रोहितने उत्सुकतेने विचारलं

”तू प्राचीचा मित्र आहेस ना, मी प्राचीकडून ऐकलंय तुझ्याबद्दल” तिने उत्तर टाईप केलं,

”अच्छा, चल बाय मी नंतर बोलतो मला लेक्चर आहे.” रोहित फेसबुकवरून लॉग आऊट झाला.

प्राचीचं नाव ऐकलं की रोहित वैतागायचा. ‘आता नक्कीच या मुलीला माझ्याबद्दल तिने काहीतरी सांगितलं असणार, ती पुढे काहीतरी विचारणार त्यापेक्षा लॉगआऊट झालेलं बरं असं म्हणून त्याने फेसबुक चॅट ऑफ करून टाकलं.

दुसऱ्या दिवशी पुन्हा रोहितला केतकीचा मेसेज होता. ”रोहित मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. प्लीज मेसेज कर”
रोहितने मेसेज वाचला, केतकीला त्याला टाळायचं नव्हतं

त्याने उत्तर दिले.

”रोहित प्राचीला तू खूप आवडतोस, ती वेडी झालीय तुझ्यासाठी. ती तुझ्यावर खूप प्रेम करते. तुला काय वाटतं? तुलाही तसंच वाटतं का?”

(क्रमशः)

– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित