मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
औरंगाबाद शस्त्र-स्फोटके साठा प्रकरण
औरंगाबाद येथून हस्तगत करण्यात आलेल्या शस्त्र आणि स्फोटकांच्या साठय़ाप्रकरणी मुंबई हल्ल्यातील आरोपी झैबुदिन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याच्याविरुद्ध विशेष 'मोक्का' न्यायालयाने शुक्रवारी विविध कायद्याअंतर्गत आरोप निश्चित केले.
िवशेष म्हणजे आतापर्यंत 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे न्यायालयासमोर हजर होणाऱ्या जुंदालला आरोप निश्चितीच्या प्रक्रियेसाठी मात्र व्यक्तिश: न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपनिश्चितीनंतर जुंदालने स्वत:ला निर्दोष म्हणवत सर्व आरोप फेटाळून लावले व आपण 'सिमी' वा लष्कर-ए-तोयबा यापैकी कुठल्याही दहशतवादी संघटनेचा सदस्य नसल्याचा दावाही त्याने केला.
दहशतवादी कारवायांसाठी शस्त्र व स्फोटके वितरीत केल्याप्रकरणी जुंदालवर 'मोक्का', भारतीय दंडविधान, शस्त्रास्त्र कायदा, स्फोटके कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा आदी विविध कायद्याअंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले. त्याआधी दहशतवादविरोधी पथकाने जुंदाल हा १९९६ सालापासून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे सांगितले.
दरम्यान, जुंदालला आर्थर रोड तुरुंगातील दहशतवादी कसाबसाठी बनविण्यात आलेल्या कडेकोट सुरक्षा असलेल्या 'अंडासेल'मध्ये ठेवण्यात आले आहे.
मात्र त्याबाबत त्याचे वकील एजाज नक्वी यांनी एक अर्ज करून जुंदालला कोठडीत एकटे ठेवले जाऊ नये, अशी विनंती केली
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















