डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माच्या रक्षणाचे काम केले आहे. त्यांनी ख्रिस्ती किंवा मुस्लिम अशा अन्य धर्माचा स्वीकार न करता बौद्ध धर्माचा स्वीकार केला, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कधीच हिंदूू धर्माच्या विरोधात नव्हते. त्यांनी फक्त हिंदू धर्मातील काही प्रवृतींचा विरोध होता. ते हिंदू धर्माला हानी पोहोचवू शकले असते. त्यांच्याकडे ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्माचा पर्याय होता. परंतु त्यांनी केवळ या देशात रुजलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार केला, असेही ते म्हणाले.
आपल्या भाषणात त्यांनी डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांची तुलना केली.  हे दोघे समाजासाठी चिकित्सक होते आणि त्यांनी समाजासाठी आपल्यापद्धतीने योगदान दिल्याचेही ते म्हणाले.