मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधी स्थळावरून रंगलेल्या वादावर आज शिवसेना कार्याध्यक्ष यांनी पहिल्यांदाच आपले मौन सोडले. शिवसैनिक हीच बाळासाहेबांची शक्ती होती आणि आजही आहे. त्यामुळे आजही अनेक शिवसैनिक येथे खडा पहारा देत आहेत. हेच शिवसैनिक स्वत:च्या हाताने शिवसेनाप्रमुखांचे समाधी स्थळ थोडे बाजूला सरकवतील, अशी भूमिका शिवसेने मुखपत्र असलेल्या 'सामना' या दैनिकातून उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कवरच राहिल असा संदेश यातून देण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी शिवेसनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेचा तपशिल घेऊन काल (बुधवार) महापौर सुनिल प्रभू आणि सुभाष देसाई यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर उध्दव ठाकरेंनी वादंग टाळण्यासाठी ही सामजस्याची भूमिका घेतल्याचे 'सामना'मध्ये म्हटले आहे.
'शिवसेनाप्रमुखांना जाऊन महिना होत असला तरी त्यांचे अस्तित्व आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. जे कधीच घडणार नाही असे वाटत होते ते घडले आहे व आजही शिवसेनाप्रमुखांच्या आठवणीने महाराष्ट्र व्याकुळ आहे. महाराष्ट्रात इतकी शोक-लहर कधीच उठली नव्हती', असंही उध्दव ठाकरे पुढे म्हणाले आहेत.
दरम्यान, अंत्यसंस्काराच्या जागेऐवजी त्याच्या लगत छोटे उद्यान तयार करणे, महापौर बंगल्यामध्ये अथवा शिवाजी पार्क तरणतलावालगत स्मारक करणे आदी पर्यायांवर विचार सुरु असून अंत्यसंस्काराची जागा मोकळी करून देईपर्यंत सरकारकडून कोणतेही सहकार्य मिळणार नाही, हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे स्पष्ट झाले आहे.




















अंत्य संस्काराला जागा देताना जे आश्वासन सेना नेत्यांनी दिले होते त्याचे काय? खेळासाठी असलेल्या मोकळ्या जागेचा अट्टाहास का? बाळासाहेबांचे क्रिकेटप्रेम जगजाहीर आहे. त्यांना हे आवडले असते?