रुग्णालयांतील जेवणासाठी चांगला तांदूळ, ब्रॅण्डेड गव्हाच्या पिठाचा वापर

स्थायी समितीच्या मार्चमधील बैठकीत रुग्णालयातील आहारावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेऊन गहू व तांदूळ खरेदीचा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला. त्यामुळे प्रशासनाने थेट बासमती तांदूळ व ब्रॅण्डेड गव्हाचे पीठ खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवला असून तो शुक्रवारी बैठकीत चर्चेला येणार आहे. नव्या प्रस्तावात तांदळाची प्रति किलो किंमत दहा रुपयांनी वाढली असून ब्रॅण्डेड गव्हाचे पीठ मात्र आधीपेक्षा साडेपाच रुपये प्रति किलोने स्वस्त पडणार आहे.

Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
guru asta 2024
१४ दिवसांनी गुरु होणार अस्त! ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; नोकरीपासून प्रेमापर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते यश
Congress election manifesto published Caste wise census
जातनिहाय जनगणना, आरक्षण मर्यादावाढ; काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी उपेक्षित, महिला 

महानगरपालिकेच्या शहर व उपनगरातील रुग्णालये, प्रसूतिगृहांसाठी गव्हाचे पीठ व तांदूळ यांचा पुरवठा करण्यासाठी सप्टेंबर २०१६ मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार ३२.५० रुपये प्रति किलो प्रमाणे २ लाख ४० हजार किलो तांदूळ आणि २८.५० रुपये प्रति किलो याप्रमाणे १ लाख ६० हजार किलो गव्हाचे पीठ खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेला आला. मात्र यावर सर्वच सदस्यांनी जोरदार विरोध केला. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केल्यावर स्थायी समितीच्या अध्यक्षांनी हा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला. प्रस्ताव दफ्तरी दाखल केल्यावर तीन महिन्यानंतर नव्याने प्रस्ताव दाखल करावा लागतो. या आरोपानंतर प्रशासनाने एप्रिल महिन्यात थेट बासमती तांदूळ व लोकवन गव्हाचे पीठ यासाठी निविदा मागवल्या. या निविदांना तीन प्रतिसाद मिळाले असून बासमती तांदळाचा सर्वात कमी दर ४२.४० रुपये प्रति किलो आहे. लोकवन गव्हाचे पीठ मात्र आधीच्या तुलनेत साडेपाच रुपये प्रति किलो कमी भावात मिळाले आहे.

पालिकेच्या नायर रुग्णालयाअंतर्गत असलेल्या आहार समितीद्वारे पालिका रुग्णालयांमधील जेवणातील पोषणमूल्यांबाबत देखरेख ठेवली जाते. नायर, केईएम, लो. टिळक आदी रुग्णालयांचे उपअधिष्ठाता तसेच आहारतज्ज्ञ या समितीत आहेत. रुग्णालयातील आहारासंदर्भात ही समिती निर्णय घेते. मात्र बासमती तांदूळ तसेच ब्रॅण्डेड पीठ घेण्याबाबत समितीने शिफारस केली नाही, स्थायी समितीने प्रस्ताव नाकारल्यानंतर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मार्चमधील प्रस्ताव

  • गव्हाचे पीठ – १ लाख ६० हजार किलो – २८.५० रुपये प्रति किलो – एकूण ४५ लाख ६० हजार रुपये.
  • तांदूळ – २ लाख ४० हजार किलो – ३२.४९ रु. प्रति किलो – एकूण ७७ लाख ९८ हजार रुपये.

जुलैमधील प्रस्ताव

  • लोकवन गव्हाचे पीठ – १ लाख ६० हजार किलो – २२.९५ रुपये प्रति किलो – एकूण ३६ लाख ७२ हजार रुपये.
  • बासमती तांदूळ – २ लाख ४० हजार किलो – ४२.४० रुपये प्रति किलो – एकूण १ कोटी २ लाख रुपये.