अर्थसाक्षरतेसाठी पुढाकार घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक ‘अर्थब्रह्म’चे प्रकाशन आज, शुक्रवारी होत आहे. या वेळी उत्पन्न ते बचत व कर ते कर्ज आदी गुंतवणूकविषयक सर्व प्रश्नांची उकल तज्ज्ञांच्या उपस्थितीत होणार आहे.
गुंतवणूकदारांसमोर बचतीचे विविध पर्याय सादर करण्यासह अर्थक्षेत्रातील भांडवली बाजार, विमा, स्थावर मालमत्ता याबाबतची प्रक्रिया ‘अर्थब्रह्म’मधून सचित्र, सोदाहरण व आकेडवारीसह मांडण्यात आली आहे. ‘अर्थब्रह्म’ प्रकाशनाच्या निमित्ताने उपस्थितांना गुंतवणूकपर मार्गदर्शनही केले जाणार आहे. यासाठी शिवाजी पार्कसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात सी.ए. जयंत गोखले, ‘लोकसत्ता’चे स्तंभलेखक अजय वाळिंबे व ‘सिबिल’च्या ग्राहक संबंध विभागाच्या प्रमुख हर्षला चांदोरकर वाचक/श्रोत्यांच्या गुंतवणुकीबाबतच्या समस्यांचे निराकरण करतील.
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर असलेला हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य आहे. याच क्रमवारीतील आणखी एक कार्यक्रम रविवारी, २७ जुलै रोजी वाशी येथे होईल.
प्रकाशन सोहळा  मार्गदर्शन मेळावा
*केव्हा :
शुक्रवार, २५ जुलै, सायंकाळी ६.३० वा.
*कुठे :
स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम)
*केव्हा :
रविवार, २७ जुलै, सायंकाळी ६ वा.
*कुठे :
साहित्य संस्कृती आणि कला मंडळ, सेक्टर-६, वाशी, नवी मुंबई