लिंगायत समाजाच्या काही पोटजाती इतर मागासवर्ग या प्रवर्गामध्ये समावेश करण्यासंदर्भात गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच या समितीच्या शिफारशीनुसार लिंगायत समाजास अल्पसंख्यांक दर्जा देण्यासाठी प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनुसार मंत्रिमंडळ उपसमितीने निर्णय घेवून राज्य मागासवर्ग आयोगाचा यापूर्वी प्राप्त झालेला अहवाल क्र. ४६ व लिंगायत समाजाबाबत प्राप्त झालेला अहवाल क्र. ४७ मधील १४ शिफारशी मान्य करण्याचा तसेच आयोगाने अमान्य केलेली १ शिफारस आयोगास पुनर्विचारार्थ पाठविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे.