‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चा ३० जून रोजी मुंबईकरांसाठी खास कार्यक्रम

झणझणीत रस्सा आणि कोंबडी वडे असो की साजूक तुपात न्हाऊन निघालेली पुरणपोळी असो, र्ती-पोहा असो की शेवेची भाजी असो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील वैशिष्टय़पूर्ण खाद्यपदार्थाची नावे घेताच तोंडाला पाणी सुटते. या पदार्थाशी खाद्यसंस्कृतीच नव्हे तर महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाचीही नाळ जुळलेली आहे. महाराष्ट्राच्या या खाद्यसंपन्नतेवरच ३० जून रोजी, गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात  चवदार गप्पा रंगणार आहेत. ‘महाराष्ट्र तुमच्या ताटात’ हे घोषवाक्य घेऊन राज्यातील विविध खाद्यसंस्कृती व पदार्थाची ओळख करून देणाऱ्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चा प्रकाशन सोहळा गुरुवारी ठाण्यात पार पडला. ‘पूर्णब्रह्म’चा कार्यक्रम खास मुंबईकरांसाठीही होणार आहे.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

महाराष्ट्राच्या एका भागातील वैशिष्टय़पूर्ण पदार्थाची दुसऱ्या भागातील खवय्यांशी ओळख करून देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने यंदाच्या ‘पूर्णब्रह्म’मधून ‘महाराष्ट्र तुमच्या ताटात’ ही संकल्पना मांडली आहे. मोहसिना मुकादम (कोकण), मंजिरी कपडेकर (पश्चिम महाराष्ट्र), आशालता पाटील (खान्देश), सायली राजाध्यक्ष (मराठवाडा) आणि विष्णू मनोहर (विदर्भ) या नामांकित शेफनी या अंकातून महाराष्ट्रातील रुचिसंपन्न खाद्यसंस्कृतीची ओळख करून दिली आहे. खाद्यसंस्कृतीबरोबरच त्या त्या प्रांतातील चवदार, चटकदार, चमचमीत पाककृती तेवढय़ाच आकर्षित छायाचित्रांसह या अंकात वाचायला मिळणार आहेत.

खवय्यांची भूक भागवण्यासोबत मेंदूला खुराकही देणाऱ्या ‘पूर्णब्रह्म’ अंकाचे प्रकाशन आज, गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे. प्रत्येकाने संग्रही ठेवावा अशा या अंकाचा प्रकाशन सोहळाही तितकाच रंगतदार होणार आहे.  पदार्थ बनवण्याची पद्धतीतील वेगळेपणच खवय्यांना त्याकडे खुणावत असते. अनेक पदार्थ, पाककृती काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या असताना पाचही शेफ विविध प्रांतांतील खाद्यपदार्थाबद्दल रसिकांसोबत गप्पा मारणार आहेत.

  • ‘पूर्णब्रह्म’ प्रकाशन सोहळा
  • कधी : गुरुवार, ३० जून
  • कुठे : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर
  • किती वाजता : सायं. ६.३० वा.
  • प्रवेश सर्वासाठी खुला

‘विम’ने प्रस्तुत केलेल्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ अंकाचे ‘एलजी’ हे सहप्रायोजक असून ‘टेस्ट पार्टनर’ रामबंधू आहेत. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘केसरी’, ‘आयुशक्ती’ यांचे या उपक्रमाला पाठबळ लाभले आहे तर, ‘कलर्स मराठी’ टेलिव्हिजन पार्टनर आहेत.