राज्यात मैलौगणिक बदलत जाणाऱ्या खाद्य संस्कृतीचा सचित्र माहितीकोश जातिवंत खवय्यांसाठी मंगळवारी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण खाद्य पदार्थाची ओळख करून देणाऱ्या ‘पितांबरी रुचियाना गूळ’ प्रस्तुत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म २०१७’ या विशेषांकाचे प्रकाशन २५ जुलै रोजी करण्यात येणार आहे. प्रकाशनाचा कार्यक्रम रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे सायंकाळी ६ वाजता होणार असून या वेळी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि खाद्यविषयक अभ्यासक मोहसिना मुकादम उपस्थित राहणार आहेत.  ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चा हा चौथा वार्षिकांक असून यात राज्यातील विविध भागांच्या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीची रसदार ओळख करून देणाऱ्या पाककृती आहेत. तसेच शाकाहारी पाककृतींबरोबरच या वर्षी मांसाहारी पाककृतींची चमचमीत मेजवानी अंकात मिळणार आहे. यंदाच्या अंकातील मानकरी आहेत, प्रसिद्ध पाककृतीतज्ज्ञ उषा पुरोहित, कल्पना तळपदे, शुभा प्रभू-साटम, अलका फडणीस, दीपा पाटील, रचना पाटील आणि ज्योती चौधरी-मलिक. त्यांच्याशी या प्रकाशन कार्यक्रमात खुमासदार शैलीत गप्पा मारतील शेफ विष्णू मनोहर. त्याचप्रमाणे मोहसिना मुकादम या ‘व्यापक होत गेलेली महाराष्ट्राची संस्कृती’ या विषयावर आपले विचार मांडतील.

* कधी       :      मंगळवार, २५ जुलै

palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
Central Government Launches Dekho Apna Desh People s Choice 2024 Survey
देशातलं कोणतं पर्यटनस्थळ ठरणार सर्वांत लोकप्रिय? होणार ऑनलाइन मतदान!

* कुठे :      रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी, सायंकाळी ६ वाजता

या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स, बँकिंग पार्टनर आहेत डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड आणि पॉवर्ड बाय केसरी टूर्स, गुणाजी एंटरप्रायजेस आणि गद्रे प्रीमियम सीफूडस्. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.