रघुनाथनगर परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय युवतीचा बलात्कार करून तिला धमकी देणाऱ्या तरुणास वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. ब्रिजेश रामा राणे (२६), असे अटक केलेल्या तरूणाचे नाव असून तो वागळे इस्टेट परिसरातील हाजुरी भागात राहतो. संबंधित १६ वर्षीय युवती घरात एकटीच असताना त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिली. महिनाभरापुर्वी ही घटना घडली. पिडीत युवतीने सोमवारी दिलेल्या तक्रारीवरून ब्रिजेशला अटक केली.किसननगर भागात राहणाऱ्या एका १७  वर्षीय युवतीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच लग्न केले नाहीतर चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकीही त्याने दिली होती.  अंकीत गुणवंत सोनी (२२), यास अटक केली आहे.