मुंबईतील ओशिवरा भागात ३५ वर्षीय एकता बब्बर या मॉडेलने इमारतीच्या १६व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, नैराश्यातून हे पाऊल उचलले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. एकताचे पार्थिव शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आले असून पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.
एकता काही छोट्या मोठ्या मॉडेलिंगमध्ये काम केले होते. मात्र, सध्या तिच्याकडे काहीच काम नव्हते. सहा महिन्यांपूर्वीच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ती आणखीनचं नैराश्यात गेलेली एकता आईसोबत ओशिवारा येथील ग्रीन अॅक्रे या इमारतीत राहत होती.