हॉटेल उभारणासाठी लागणाऱ्या ७५ विविध परवान्यांची संख्या कमी करून त्यांची संख्या २५ वर आणली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी सांगितले. हॉटेल उभारणीसाठी विविध शासकीय परवानगी असलेल्या ७५ परवान्यांची आवश्यकता लागत होती. ही प्रक्रिया फार किचकट आणि वेळखाऊ होती. ती कमी करण्यासाठी हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया प्रयत्न करत होती. फडणवीस यांनी त्याला प्रतिसाद देत परवान्यांची संख्या २५वर आणण्याचे आश्वासन देत केवळ ६ अर्ज लागतील असेही सांगितले. संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले असून हॉटेल व्यावसायिकांना हा मोठा दिलासा असून त्यामुळे राज्यात हॉटेल उभारणी सुलभ होईल, अशी प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष भरत मलकानी यांनी दिली.