कोकण रेल्वेतर्फे विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या गाडय़ा मार्चच्या मध्यापासूनच सोडण्यात येणार असून जूनच्या मध्यापर्यंत चालवण्यात येतील. या विशेष फेऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी, दादर-सावंतवाडी आणि दादर-झाराप अशा चालवण्यात येणार आहेत.
०१००५ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी ही वातानुकूलित विशेष गाडी १ एप्रिल ते ३ जून या कालावधीत दर शुक्रवारी रात्री १.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघणार आहे. ही गाडी त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता करमाळीला पोहोचेल. ०१००६ अप करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही वातानुकूलित विशेष गाडी याच कालावधीत दर शुक्रवारी दुपारी १.१० वाजता करमाळीहून निघेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.०१०९५ डाऊन दादर-सावंतवाडी विशेष गाडी १७ एप्रिल ते ७ जून या कालावधीत दर रविवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी दादरहून सकाळी ७.५० वाजता निघेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. ०१०९६ अप सावंतवाडी-दादर ही गाडी १८ एप्रिल ते ८ जून या कालावधीत दर सोमवार, बुधवार आणि शनिवार या दिवशी सावंतवाडी येथून पहाटे ४.५० वाजता निघेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी ३.५० वाजता दादरला पोहोचणार आहे. ०१०३३ डाउन दादर-झाराप ही विशेष गाडी १८ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत दर रविवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी दादरहून सकाळी ७.५० वाजता निघेल.