वांद्रे येथील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी शस्त्र घेऊन आलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीचे नाव राम मिलन शर्मा असल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांना कार्यकर्ते भेटण्यासाठी आले असताना या कार्यकर्त्यांच्या गर्दीत एक संशयित व्यक्ती आढळला. चौकशी केली असता त्याच्याजवळ चाकू आणि ब्लेड्स आढळले. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी खेरवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीदरम्यान, आपण व्यवसायाने न्हावी असल्याने चाकू बाळगत असल्याचे स्पष्टीकरण शर्मा याने दिले आहे. पोलीस त्याची आणखी चौकशी करीत आहेत.