शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आजच्या (बुधवार) त्यांच्या पहिल्या जयंतीला उध्दव ठाकरे यांची शिवसेना कार्याध्यक्ष पदावरून अध्यक्ष पदावर बढती देण्यात आली आहे. मुंबईतील शिवसेना भवनात पार पडलेल्या शिवसेना कार्यकारिणी बैठकीत हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. यापुढे पक्षाचे सर्वाधिकार उध्दव ठाकरेंकडे असतील. आजच्या बैठकीसाठी राज्यभरातून महत्वाचे शिवसेना नेते मुंबईत दाखल झाले आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांचे नोव्हेंबर २०१२ मध्ये निधन झाल्यानंतर राजकीय पटलावरून थोडे बाजूला गेलेले उध्दव ठाकरे अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रीय होण्यास तयार झाले आहेत. दरम्यान, युवासेने आदित्‍य ठाकरे यांनाही शिवसेनेमध्‍ये नेतेपद देण्‍यात येणार असल्याची चर्चा आहे.