ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचे आज ८३ व्या वर्षांत पदार्पण
‘‘आयुष्याच्या या वळणावर मी समाधानी, समृद्ध आणि आनंदी आहे. ‘शुक्रतारा मंद वारा’ या गाण्याने आणि मराठी भावसंगीतानेच मला घडविले, त्याचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही. मराठी भावसंगीताने केवळ सांगीतिकच नव्हे, तर माझे एकूणच आयुष्य समृद्ध केले..’’ मराठी भावगीतांमधील कोमल व तरल ‘मखमली’ स्वर आणि मराठी भावसंगीतामधील ‘शुक्रतारा’ अर्थात ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते सांगत होते..
उद्या (४ मे) रोजी दाते ८३व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडे त्यांनी आपल्या भावना अशा शब्दांत व्यक्त केल्या.
मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि मी व सुधा मल्होत्रा यांनी गायलेल्या ‘शुक्रतारा’ या गाण्याने मला भरभरून दिले. मराठी भावसंगीत आणि गायनाचा माझा नवा प्रवास या गाण्याने सुरू झाला. पुढे अनेक गीतकारांची आणि संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी गायलो. मी गायलेली जवळपास सर्वच भावगीते लोकप्रिय झाली. इतक्या वर्षांनंतरही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. या सगळ्यात त्या त्या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार यांचेही महत्त्वाचे योगदान असल्याचे दाते यांनी सांगितले.
‘‘मराठी भावसंगीत आणि गाण्यांमुळे मला यश, प्रसिद्धी, पैसा, थोरांचे आशीर्वाद आणि रसिकांचे भरभरून प्रेम मिळाले. आता तुम्ही थांबा, असे रसिकांनी गायकाला सांगण्यापेक्षा त्याने अगोदरच थांबलेले बरे असते. आयुष्याच्या एका टप्प्यावर व योग्य वेळी मी थांबलो याचे मला समाधान आहे. आयुष्यात कधीही कोणाच्याही दबावाखाली मी गायलो नाही,’’ असेही दाते म्हणाले.

‘शुक्रतारा मंद वारा’ या लोकप्रिय गाण्याला ५ मे रोजी ५४ वर्षे पूर्ण होत आहेत. या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी गाण्याचे गीतकार मंगेश पाडगावकर आणि संगीतकार श्रीनिवास खळे हे उपस्थित होतेच. पण या दोघांसह अभिनेते, संगीतकार आणि हार्मोनियम वादक गोविंदराव टेंबे, अरुण दाते यांचे वडील रामुभय्या दाते, अरुण दाते यांचे काका रवी दाते, अरुण दाते यांचे पारसी मित्र उनवाला, अनिल मोहिले (संगीत संयोजक म्हणून त्यांचे ‘शुक्रतारा’ हे पहिले गाणे) आणि साक्षात ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ पु. ल. देशपांडे उपस्थित होते.

Marathi dancer ashish patil will work with Sanjay Leela Bhansali
‘या’ मराठमोळ्या नृत्यदिग्दर्शकाला मिळाली संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याची संधी; म्हणाला, “माझे अश्रू अनावर…”
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’