नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी आज सकाळी फुटली. त्यामुळे सुमारे ३० फूट उंच कारंजे उडू लागले. लाखो लिटर स्वच्छ पाणी वाया गेले आहे. रस्त्यावर पाणी आल्याने सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली येथे आज सकाळी रत्यालगत जेसीबीने खोदकाम सुरु होते. हे काम सुरू असतानाच येथील जलवाहिनी फुटली. मोरबे धरणातून नवी मुंबईला या वाहिनीद्वारे पाणीपुरवठा होतो. जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.