23 August 2017

News Flash

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर ‘क्विन’ कंगना

  • झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचाचे आकर्षण बॉलिवुड सेलिब्रिटींमध्ये वाढतच चालले आहे. आजवर बॉलिवुडमधील दिग्गजांनी या मंचावरून आपल्या चित्रपटांची प्रसिद्धी केली. या यादीमध्ये आता आणखी एका नावाची भर पडणार आहे ते नाव म्हणजे बॉलिवुडची ‘क्विन’ अशी ओळख असलेली कंगना रणौत.

    झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचाचे आकर्षण बॉलिवुड सेलिब्रिटींमध्ये वाढतच चालले आहे. आजवर बॉलिवुडमधील दिग्गजांनी या मंचावरून आपल्या चित्रपटांची प्रसिद्धी केली. या यादीमध्ये आता आणखी एका नावाची भर पडणार आहे ते नाव म्हणजे बॉलिवुडची ‘क्विन’ अशी ओळख असलेली कंगना रणौत.

  • आपल्या आगामी 'रंगून' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कंगनाने थुकरटवाडीत हजेरी लावली होती.

    आपल्या आगामी 'रंगून' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कंगनाने थुकरटवाडीत हजेरी लावली होती.

  • येत्या सोमवारी २० फेब्रुवारीला रात्री ९.३० वा. हा भाग झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.

    येत्या सोमवारी २० फेब्रुवारीला रात्री ९.३० वा. हा भाग झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.

  • एक सशक्त अभिनेत्री अशी ओळख कंगनाला ज्या चित्रपटाने मिळवून दिली त्या क्विन चित्रपटाची थुकरटवाडीच्या मंडळींनी सादर केलेली आवृत्ती बघून कंगनाही खळखळून हसली.

    एक सशक्त अभिनेत्री अशी ओळख कंगनाला ज्या चित्रपटाने मिळवून दिली त्या क्विन चित्रपटाची थुकरटवाडीच्या मंडळींनी सादर केलेली आवृत्ती बघून कंगनाही खळखळून हसली.

  • 'चला हवा येऊ द्या'च्या मंडळीसोबत कंगनाने 'लंडन ठुमकदा' गाण्यावर ताल धरत नृत्यही सादर केलं.

    'चला हवा येऊ द्या'च्या मंडळीसोबत कंगनाने 'लंडन ठुमकदा' गाण्यावर ताल धरत नृत्यही सादर केलं.

  • विशाल भारद्वाज यांचे दिग्दर्शन असलेला ‘रंगून’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून यात कंगना मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे तर तिच्या सोबतीने शाहिद कपूर आणि सैफ अली खान असे दोन तगडे अभिनेते या चित्रपटात आहेत.

    विशाल भारद्वाज यांचे दिग्दर्शन असलेला ‘रंगून’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून यात कंगना मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे तर तिच्या सोबतीने शाहिद कपूर आणि सैफ अली खान असे दोन तगडे अभिनेते या चित्रपटात आहेत.

  • 'रंगून' चित्रपटाच्या निमित्ताने कंगना पहिल्यांदाच एका मराठी कार्यक्रमात हजर झाली.

    'रंगून' चित्रपटाच्या निमित्ताने कंगना पहिल्यांदाच एका मराठी कार्यक्रमात हजर झाली.

अन्य फोटो गॅलरी

  1. No Comments.