23 October 2017

News Flash

शहेनशहा आणि खिलाडीची भेट होते तेव्हा….

 • अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या 'पॅडमॅन'चे दिग्दर्शन आर बल्की करत आहेत. या चित्रपटात 'पार्च्ड' अभिनेत्री राधिका आपटे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती सोनम कपूर यांच्यादेखील भूमिका आहेत. विविध कारणांमुळे सध्या हा चित्रपट चर्चेत असल्याचे पाहायला मिळतेय. पहिलं कारण म्हणजे ट्विंकल खन्ना पहिल्यांदाच 'पॅडमॅन' च्या निमित्ताने निर्मिती क्षेत्रात उतरतेय. दुसरं कारण म्हणजे, चित्रपटाची कथा खेड्यातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणाऱ्या अरुणाचलम् यांच्या जीवनावर आधारित आहे. आता तर बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन हेदेखील या चित्रपटात झळकणार असल्याचे समोर आलेय.

  अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या 'पॅडमॅन'चे दिग्दर्शन आर बल्की करत आहेत. या चित्रपटात 'पार्च्ड' अभिनेत्री राधिका आपटे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती सोनम कपूर यांच्यादेखील भूमिका आहेत. विविध कारणांमुळे सध्या हा चित्रपट चर्चेत असल्याचे पाहायला मिळतेय. पहिलं कारण म्हणजे ट्विंकल खन्ना पहिल्यांदाच 'पॅडमॅन' च्या निमित्ताने निर्मिती क्षेत्रात उतरतेय. दुसरं कारण म्हणजे, चित्रपटाची कथा खेड्यातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणाऱ्या अरुणाचलम् यांच्या जीवनावर आधारित आहे. आता तर बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन हेदेखील या चित्रपटात झळकणार असल्याचे समोर आलेय.

 • अरुणाचलम् मुरुगानंदम् यांची मुख्य भूमिका साकारत असलेला अक्षय कुमार सध्या दिल्लीमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करत असून आता अमिताभही तेथे पोहचले आहेत. दिवसभर प्रवास आणि चित्रीकरणात वेळ गेल्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवरून आर बल्की आणि अक्षयसोबत काम करण्याचा अनुभव व्यक्त केला.

  अरुणाचलम् मुरुगानंदम् यांची मुख्य भूमिका साकारत असलेला अक्षय कुमार सध्या दिल्लीमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करत असून आता अमिताभही तेथे पोहचले आहेत. दिवसभर प्रवास आणि चित्रीकरणात वेळ गेल्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवरून आर बल्की आणि अक्षयसोबत काम करण्याचा अनुभव व्यक्त केला.

 • आर बल्की आणि अमिताभ यांनी याआधीही ‘चीनी कम’, ‘पा’, ‘शमिताभ’ आणि 'की अॅण्ड का' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

  आर बल्की आणि अमिताभ यांनी याआधीही ‘चीनी कम’, ‘पा’, ‘शमिताभ’ आणि 'की अॅण्ड का' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

 • अमिताभ बच्चन यांच्यासोबत संवाद साधताना सोनम कपूर.

  अमिताभ बच्चन यांच्यासोबत संवाद साधताना सोनम कपूर.

 • अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्या आयुष्यावर ‘पॅडमॅन’ हा सिनेमा बेतलेला आहे. मासिक पाळीकडे आपल्याकडे आजही गुप्ततेचा विषय म्हणून बघितले जाते. एवढंच काय तर काही वर्षांपूर्वी मासिक पाळीत घ्यावी लागणारी स्वच्छता हीदेखील दुर्लक्षिलेलीच गोष्ट होती. पण, अरुणाचलम् यांच्या ते लक्षात आले आणि त्यांनी स्त्रियांसाठी विशेषतः खेड्यातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार केले. यातून त्यांनी अनेक स्त्रियांना रोजगारही मिळवून दिला, यावरच ‘पॅडमॅन’ चित्रपट आधारित आहे. ‘पॅडमॅन’ची म्हणजेच अरुणाचलम् मुरुगानंदम् यांची मुख्य भूमिका अक्षय साकारत आहे.

  अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्या आयुष्यावर ‘पॅडमॅन’ हा सिनेमा बेतलेला आहे. मासिक पाळीकडे आपल्याकडे आजही गुप्ततेचा विषय म्हणून बघितले जाते. एवढंच काय तर काही वर्षांपूर्वी मासिक पाळीत घ्यावी लागणारी स्वच्छता हीदेखील दुर्लक्षिलेलीच गोष्ट होती. पण, अरुणाचलम् यांच्या ते लक्षात आले आणि त्यांनी स्त्रियांसाठी विशेषतः खेड्यातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार केले. यातून त्यांनी अनेक स्त्रियांना रोजगारही मिळवून दिला, यावरच ‘पॅडमॅन’ चित्रपट आधारित आहे. ‘पॅडमॅन’ची म्हणजेच अरुणाचलम् मुरुगानंदम् यांची मुख्य भूमिका अक्षय साकारत आहे.

 • अक्षय कुमारसह त्याची पत्नी ट्विंटकल

  अक्षय कुमारसह त्याची पत्नी ट्विंटकल

अन्य फोटो गॅलरी