मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर भाजपचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षातील वाद वाढला असून एका पक्षाने आरोप करताच दुसऱ्या पक्षाकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतील प्रचाराची झलकच पहायला मिळत आहे.

wardha lok sabha constituency, sharad pawar ncp , tutari symbol, different identity, different name, vidarbha, find new solution, avoid confusion, amar kale, wardha news, wardha ncp, lok sabha 2024,
तुतारी टोचाची की फुकाची? मतदारांना पडलेला प्रश्न अन् त्यावर शोधले मग ‘हे’ उत्तर
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
uddhav thackeray and kangana
“भाजपाई कंगनाने तिचे अगाध ज्ञान पाजळून इतिहासाची…”, ठाकरे गटाचा टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी महापालिकेच्या प्रभागरचनेची मोडतोड केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पिंपरीतील पत्रकार परिषदेत करताच त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘राष्ट्रवादीत सुरू असलेल्या गळतीमुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाबे दणाणले असून त्यांचे पिंपरी-चिंचवडचे दौरेही त्यामुळे वाढले आहेत,’ असे प्रत्युत्तर भाजपकडून तटकरे यांच्या आरोपाबाबत देण्यात आले आहे.

पिंपरी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात येत असलेल्या प्रभागरचनेत भाजपच्या कोणत्याही नेत्याचा कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसताना राष्ट्रवादीकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. या वादाच्या पाश्र्वभूमीवर ‘भाजपची वाढती ताकद पाहून राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते अमर साबळे आणि सदाशिव खाडे यांनी व्यक्त केली आहे. पिंपरी महापालिकेत गेल्या १० वर्षांत राष्ट्रवादीने भ्रष्ट कारभाराची परिसीमा गाठली आहे. तो भ्रष्टाचार उघडकीस येण्याची राष्ट्रवादीला धास्ती आहे. राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने अजित पवारांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच तटकरे यांना पुढे करून मुख्यमंत्र्यांनी प्रभागरचनेत हस्तक्षेप केल्याचे बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी भाजपमध्ये येत आहेत, असेही भाजपचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देतानाच पुढील महिन्यात राष्ट्रवादीतील मोठा गट भाजपमध्ये येणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. त्यामुळेच सहा महिन्यातून एकदा पिंपरीत येणाऱ्या अजित पवारांचे दौरे वाढले असून आता ते आठवडय़ातून दोन वेळा येऊ लागले आहेत. तरीही पक्षातील गळती ते थांबवू शकलेले नाहीत, असेही भाजपचे म्हणणे आहे.