मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- ययाति आणि देवयानी
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
कर्जवसुलीच्या मुद्दय़ावर रिझव्र्ह बँकेने घातलेले र्निबध कायम असतानाच रुपी को-ऑप. बँकेचे संचालक मंडळ अखेर मंगळवारी बरखास्त करण्यात आले. साखर आयुक्तालयातील सहसंचालक (अर्थ) संजय भोसले आणि महाराष्ट्र सहकारी बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर या दोन सदस्यांचा समावेश असलेले प्रशासक मंडळ यापुढे बँकेचा कारभार पाहणार आहे.
रिझव्र्ह बँकेचे कार्यकारी अधिकारी कुरुप्प स्वामी हे एका कार्यक्रमासाठी मंगळवारी पुण्यात आले होते. त्यावेळी कुरुप्प स्वामी यांनी संजय भोसले आणि विद्याधर अनास्कर या दोन प्रशासक मंडळाच्या नावांची घोषणा केली. संजय भोसले हे या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष असून विद्याधर अनास्कर सदस्य म्हणून काम पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी संचालक मंडळाने कुरुप्प स्वामी यांची भेट घेऊन या आर्थिक र्निबधातून निवृत्तिवेतनावर अवलंबून असलेले ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि विद्यार्थी खातेदारांना सूट द्यावी, अशी मागणी केली.
कर्जवसुलीमध्ये आलेले अपयश आणि संचालक मंडळातील वाद यामुळे रिझव्र्ह बँकेने रुपी बँकेवर तीन दिवसांपूर्वी (२३ फेब्रुवारी) आर्थिक र्निबध घातले. या र्निबधांनुसार खातेदारांना सहा महिन्यांतून एकदाच बँकेतून एक हजार रुपये काढता येणार आहेत. तर, ठेवीदारांना त्यांच्या ठेवी काढून घेता येणार नाहीत. त्यामुळे खातेदार आणि ठेवीदार यांच्यापुढे संकट निर्माण झाले. संचालक मंडळातील सहा संचालकांनी दिलेले राजीनामे परत घेऊन मंडळामध्ये एकजूट दाखविण्याचा प्रयत्न झाला. पण, अखेर संचालक मंडळाच्या बरखास्तीने या नाटय़ावर पडदा पडला आहे.



















नुसते संचालक मन्डळ बरखास्त करून काय होणार. बँक बुडवणा-या आजी आणि माजी संचालकांची आणि त्यांच्या सर्व कुटुंबाची अधिकृत आणि अनधिकृत संपत्ती जप्त केली तर काहीतरी फरक पडेल, नाहीतरी पेण अर्बन बँकेसारखे होईल. धारकर गेले राष्ट्रवादीत तुपानिशी आणि खातेदार बसले उपाशी.
मुळात राजकारण्यांशी सम्बन्धित संचालकांच्या जवळचे राजकारण्यांना देखील अटक करून दंड करा म्हणजे सगळे हरामखोर ताळ्यावर येतील.