पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात सध्या मोठय़ा संख्येने 25chilte2वाढलेली चिलटे हा घरातील माश्यांची आणि फळांवर वाढणाऱ्या माश्यांचीच छोटी आवृत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्याचे दमट वातावरण आणि शहरभर पसरलेले कचऱ्याचे साम्राज्य या गोष्टी ही चिलटे वाढण्यास कारणीभूत ठरल्या असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यांच्यामुळे कोणताही थेट संसर्ग पसरण्याचा धोका नसला तरी शहरातील घाणीवर बसून ती इतरत्र पसरवण्याचा या चिलटांचा हात असल्याने काळजी घ्यावी लागणार आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरात चिलटांची संख्या गेल्या आठ-दहा दिवसांपासून लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. ती चेहऱ्याभोवती घोंघावत असल्याने आणि डोळ्यात जात असल्याने नागरिकांना होणारा त्रास वाढला आहे. ती संपूर्ण शहरभर असल्याने त्यांच्यावर कसे नियंत्रण मिळवायचे याची चिंता महापालिकेला सतावत आहे. कचरा साचलेल्या परिसरात चिलटांची संख्या मोठी आहे.
ही चिलटे घरातील आणि फळांवर घोंघावणाऱ्या माश्यांच्या जातकुळीतील आहेत. त्यांची संख्या वाढण्यास सध्याची हवेतील आद्र्रता आणि जागोजागी साचणारा कचरा या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. आद्र्रता कमी झाली आणि तापमानात वाढ झाली की त्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे, असे कीटकशास्त्रज्ञांनी सांगितले.

का व कशामुळे?
‘‘चिलटांसारख्या कीटकांची संख्या वाढण्यास अनेक कारणे असतात. त्यांना पूरक वातावरण मिळाले की त्यांचा उद्रेक होतो. गेल्या वर्षी वेगळ्याच जातीची चिलटे वाढली होती. सध्या गेल्या काही दिवसांत पाऊस पडल्यामुळे हवेत आद्र्रता वाढली आहे. त्याचबरोबर शहरभर कचऱ्याचे साम्राज्य आहे. त्यामुळे त्यांच्या वाढीसाठी पुरेसे जैविक पदार्थ उपलब्ध आहेत.
या माश्यांमुळे थेट कोणताही संसर्ग होत नाही. मात्र, ती घाणीवर बसून आपल्या संपर्कात आली की आजार वाढू शकतात. पुढच्या काही दिवसांत पाऊस पडला, तर त्यांची संख्या कायम राहील. मात्र, वातावरण कोरडे बनल्यास ती कमी होईल. चिलटे शहरभर असल्याने त्यांच्यावर किती फवारणी करणार, हा प्रश्न आहेच. त्याऐवजी त्याच्या मुळाशी असलेली कचऱ्याची समस्या सोडवायला हवी.’’
– डॉ. हेमंत घाटे, ज्येष्ठ कीटकशास्त्रज्ञ

10 percent increase in prices of fruits vegetables prices of leafy vegetables stable
फळभाज्यांच्या दरात १० टक्के वाढ, पालेभाज्यांचे दर स्थिर
hot temperature, reptiles, snakes affected, cold temperature, enters in citizen colony, marathi news, snake news, snake in uran, uran news, uran snake news,
उरण : उन्हाच्या तडाख्याचा सरपटणाऱ्या प्राण्यांना फटका, गारव्यासाठी नागरी वस्तीत शिरकाव
pune vegetable prices marathi news
पुणे: बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर; पालेभाज्यांच्या दरात घट
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम