पुण्यातील चांदणी चौकात एका डंपरने रस्त्यावरुन चालणाऱ्या तिघींना उडवल्याची घटना घडली. तीव्र उतारावर डंपर चालकाचे गाडीवरील नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाला. यात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दहा वर्षीय निकिताचा रुग्णालयात उचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजत आहे. अपघातातील जागीच ठार झालेली पूजा चव्हाण ही तरुणी लोहिया जैन आयटी पार्कमध्ये काम करत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथून कोथरुडच्या दिशेने सकाळी साडे नऊच्या सुमारास येणाऱ्या डंपरने या मुलींना उडवले. चांदणी चौक येथे असलेल्या तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटला. यावेळी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत असलेल्या तिघींना डंपरने जोरदार धडक दिली. यामध्ये पूजा चव्हाण (वय २३) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर निकिता दत्ता मोने (वय १०) आणि शीतल राठोड (वय २३) या दोघीं गंभीर जखमी झाल्या होत्या. निकिताला ससून तर शीतलला सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नागरिकांनी डंपर चालक तेजू भिखू राठोड याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
mumbai 8 year old girl rape marathi news
मुंबई : आठ वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक
Punjab Girl, 10, Dies After Eating Cake Ordered Online On Her Birthday
वाढदिवसाला ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, कुठे घडली घटना?