डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेने या वर्षी ‘तेजोनिधी’ या वार्षकि नियतकालिकाची इंटरनेट आवृत्ती प्रकाशित केली आहे. सोसायटीच्या आजीव सदस्या डॉ. सविता केळकर यांच्या हस्ते नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले.
शाला समितीचे अध्यक्ष किरण शाळिग्राम यांच्या कल्पनेतून गेली दोन वष्रे डिजिटल स्वरूपातील नियतकालिक प्रकाशित करण्यात येते. सर्व विद्यार्थ्यांना ते डीव्हीडी स्वरूपात दिले जाते. यंदा पहिल्यांदाच त्याची इंटरनेट आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे. मराठी माध्यमांच्या शाळेच्या नियतकालिकाची इंटरनेट आवृत्ती पहिल्यांदाच प्रकाशित होत असल्याचा दावा शाळेने केला आहे.
शाळेचे अनेक माजी विद्यार्थी, पालक देशविदेशात स्थायिक झाले आहेत. शाळेच्या प्रगतीची वाटचाल, उपक्रम यांची माहिती त्यांना एका क्लिकवर मिळावी, हा इंटरनेट आवृत्ती प्रकाशित करण्याचा उद्देश असल्याचे शाळिग्राम यांनी सांगितले.
डॉ. केळकर म्हणाल्या, ‘नियतकालिकाच्या छपाईसाठी लागणारा कागद वाचल्यामुळे पर्यावरण रक्षणाला हातभार लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा संगणक व इंटरनेटशी वापर वाढायला या उपक्रमाची मदत होणार आहे.’
शाळेच्या वर्षभरातील सर्व कार्यक्रमांचे अहवाल, छायाचित्रे, महत्त्वाच्या उपक्रमांचे व्हिडिओ, विद्यार्थ्यांचे लेख, कविता, चित्रे आदींचा अंकामध्ये समावेश आहे. अंकाची तांत्रिक निर्मिती स्मार्ट कॉम्प्युटर्स (इंडिया) लिमिटेडचे हेमंत वाळिंबे यांनी केली असून, शरद प्रभुदेसाई यांनी मुखपृष्ठ तयार केले आहे. मुख्याध्यापक प्रल्हाद शिंदे, उपमुख्याध्यापिका चारुशीला वंजारी, पर्यवेक्षक सुनील शिवले, रजनी कोलते यांनी मार्गदर्शन केले. चारुता प्रभुदेसाई यांनी संपादक व सुहास देशपांडे यांनी सहसंपादक म्हणून काम पाहिले आहे.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
mpsc result, mpsc latest news
एमपीएससीतर्फे मुद्रांक निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर
CET Cell, Reschedules Entrance Exams, for Third Time, lok sabha 2024, elections, Releases Revised Schedule, marathi news,
विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, सीईटी सेलकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध