प्रश्न – मी इंग्रजी शाळेत शिक्षक आहे. मला मराठी इंग्रजी भाषांतर, विकिपीडिया, इंटरनेट ब्राऊजिंग, इंग्रजी शब्दकोश आदी उपयोगांसाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप हवा आहे, किंवा टॅबलेटही चालेल. कृपया मला यातील पर्याय सूचवा.  – सचिन जोशी
उत्तर – तुम्हाला ज्या कामासाठी संगणक किंवा लॅपटॉप हवा आहे ती सर्व कामं आता टॅबलेटवर अगदी चांगल्याप्रकारे करता येऊ शकतात. टॅबलेटवर टायपिंगची अडचण असते. पण तुम्हाला टायपिंगचे किती काम करायचे आहे त्यावर हे ठरवता येईल. तुमच्या प्रश्नामध्ये तुम्ही बजेटचा उल्लेख केला असता तर पर्याय सुचविणे आणखी सोपे गेले असते. तुमच्या उपयोगासाठी नेटबुक, मिनिलॅपटॉपचे चांगले पर्यायही उपलब्ध आहेत. बाजारात एमएसआय, असूस, एचपी या चांगल्या ब्रँडचे मिनिलॅपटॉप पंधरा हजारांपासून उपलब्ध आहेत. तुम्ही टॅबचा विचार करणार असाल तर आयबॉलने नुकताच स्लाइड नावाचा टॅब बाजारात आणला आहे. या टॅबसोबत कीबोर्डही देण्यात आला आहे. टॅबसाठी कीबोर्ड असलेले एक विशिष्ट प्रकारचे कव्हर तयार करण्यात आले आहे. या टॅबमध्ये विंडोज ८.१ ही ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली असून यात ३२ जीबी अंतर्गत साठवण सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय आपण कार्ड वापरून ही क्षमता वाढवू शकतो. यामध्ये एक टीबी क्लाऊड साठवणीचीही सुविधा देण्यात आली असून त्यासाठी काही पैसे मोजावे लागतात. हा डिटॅचेबल असल्यामुळे आपल्याला पाहिजे तेव्हा टॅब आणि पाहिजे तेव्हा लॅपटॉप असे होऊ शकते. याची किंमत २४ हजार ९९९ इतकी आहे. असेच पर्याय एचपीमध्येही उपलब्ध आहेत.
प्रश्न – मला यूएसबी किंवा वायफाय डोंगल घ्यायचे आहे. कोणत्या कंपनीचे डोंगल घेणे फायदेशीर होईल. या डोंगलमध्ये मला जास्तीत जास्त स्टोअरेजही हवे आहे. भरत शिंदे
उत्तर – डोंगल घेताना नेहमी एक काळजी घ्यायची ती म्हणजे आपण जास्त वेळ हे डोंगल कुठे वापरणार आहोत त्या ठिकाणी रेंज येते की नाही. तुम्ही आता वायफाय डोंगल घेतलेले चांगले. म्हणजे एकादा तुम्ही ते जोडले की चार ते पाच उपकरणे त्या आधारे इंटरनेटला जोडता येऊ शकतात. सध्या वायफाय डोंगल एअरटेल, डोकोमो अशा मोबाइल कंपन्या पुरवीत आहेत. तुमच्या गरजेनुसार कंपन्यांचे विविध प्लॅन्स उपलब्ध आहेत.

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत