विविध प्रकारच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपत्रिका वापरण्याची सोय देणारे एसएमएस अ‍ॅप टेक्स्ट वेब या कंपनीने बाजारात आणले आहे. त्यातून विद्यार्थ्यांना विविध परीक्षांच्या नमुना प्रश्नपत्रिका पाहता येतात. त्यात दहावी, बारावी, आयबीपीएस (बँकिंग)च्या प्रवेश परीक्षा, जेईई, एआयआयएम्स, एमबीए आणि यूपीएससीचा समावेश आहे. इन्टयूट आयएनसीने आणलेले टेक्स्टवेब हे क्लाऊडवर आधारित जागतिक व्यासपीठ असून त्यातून साहित्य आणि सेवा एका सोप्या एसएमएसद्वारे कोणत्याही मोबाइल फोनवर उपलब्ध करून दिल्या जातात.
या अ‍ॅपसाठी इंटरनेटचा वापर करण्याची गरज नाही. तुम्हाला पाहिजे त्या परीक्षांचे कीवर्ड जर तुम्ही एसएमएस केले तर त्या परीक्षांशी संबंधित माहिती आणि प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध होऊ शकणार आहेत. हे कीवर्ड तुम्ही ५१११५वर पाठवायचे आहेत.
कीवर्डस् खालीलप्रमाणे.
दहावी बोर्ड – @10board
िबारावी बोर्ड -@12board
िआयबीपीएस परीक्षा (बँकिंग) – @@ibpstest
जेईई – @jee
एआयआयएम्स परीक्षा – @aiims
एमबीए परीक्षा – @logic
यूपीएससी परीक्षा – @upsc
या सुविधेच्या माहितीसाठी तुम्ही http://www.txtweb.com/ या संकेत स्थळाला भेट देऊ शकतात.