23 October 2017

News Flash

Tech नॉलेज : जीमेल अकाऊंट डिलिट कसे करू ?

तुम्ही जीमेल अकाऊंड डिलिट करताना सर्वप्रथम तुमचं अकाऊंट युटय़ुब, गुगल प्लस यावरून साइन आऊट

मुंबई | Updated: August 8, 2014 3:42 AM

१. मला माझे जीमेल अकाऊंट डिलिट करावयाचे आहे. तर त्यासाठी काय करता येईल.
– विकास सातपुते
उत्तर – तुम्ही जीमेल अकाऊंड डिलिट करताना सर्वप्रथम तुमचं अकाऊंट युटय़ुब, गुगल प्लस यावरून साइन आऊट आहे का याची खातरजमा करून घ्या. यानंतर जीमेलवर लॉगइन करा. लॉगइन झाल्यावर अकाऊंट पर्यायामध्ये जा. तेथे डेटा टूल्स असा टॅब असतो. या टॅबमध्ये डिलिट अकाऊंट अँड डेटा असा पर्याय आहे. यावर क्लि करा. यानंतर तुम्हाला तीन पर्याय येतील त्यावर क्लिक करा. यानंतर तुमचा पासवर्ड टाइप करा. मग डिलिट अकाऊंट हा पर्याय स्वीकारा तुमचं अकाऊंट डिलिट होईल.
२. माझ्या मोबाइलमधील आणि व्हॉट्सअ‍ॅपवरील इमेजेस संगणकात पाहायच्या असतील तर काय करता येईल. – भारत माळी
उत्तर – तुम्हाला तुमच्या फोनमधील फोटो संगणकात पाहायच्या असतील तर तुम्हाला संगणकाशी डेटा केबलने मोबाइल जोडावा लागेल. तुम्ही मोबाइल संगणकाला जोडला की नवीन ड्राइव्ह तयार होतो आणि त्यावर क्लि केल्यावर तुम्हाला मोबाइलमधील वेगवेगळय़ा फाइल्स दिसतात. जर तसे करता येत नसेल तर तुम्ही सर्व फोटो मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर करून नंतर कार्ड मोबाइलमधून काढून कार्ड रिडरच्या साहय्याने त्यातील फोटो संगणकात पाहू शकतात.

First Published on August 8, 2014 3:42 am

Web Title: how to delete a gmail account