गेल्या २५ वर्षांमध्ये व्हिडिओकॉन या ब्रॅण्डने भारतीय जनमानसामध्ये स्वतची अशी एक वेगळी छबी निर्माण केली आहे. व्हिडिओकॉनचा मोबाईल घेताना लोक हजार वेळा विचार करत असले तरी जेव्हा टीव्ही विकत घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र अनेकदा पहिली पसंती व्हिडिओकॉन असते. त्यामुळे त्यांच्या टीव्ही सेटस्ना चांगली मागणी आहे. स्मार्ट टीव्हीमध्येही त्यांनी डीडीबी एलइडी टीव्ही आता बाजारात आणला आहे. दृश्यरूपामध्ये हा एलइडी टीव्ही बाजी मारतो ती त्याच्या आकारामध्ये. ५८, ६५ आणि ८० इंच या मोठय़ा आकारांमध्येच तो उपलब्ध आहे.  या टीव्हीची खरेदी केल्यानंतर तुम्हाला वेगळा सेट टॉप बॉक्स विकत घेण्याची गरज नाही. कारण व्हिडिओकॉनने या टीव्हीमध्येच तुम्हाला सेट टॉप बॉक्सही आतमध्येच दिला आहे. अर्थात केवळ हेच त्याचे वैशिष्टय़ नाही तर याशिवाय स्मार्ट टीव्ही असे म्हटल्यानंतर ज्या काही सुविधा तुम्हाला त्यामध्ये मिळतात, त्या त्या सर्व सुविधा या टीव्हीमध्ये समाविष्ट आहेतच.
त्याही पलीक़डे जाऊन व्हिडिओकॉनने टूडी आणि थ्रीडी कन्व्हर्जनची सोय यात दिली आहे. या टीव्हीचा आनंद अधिक चांगला लुटता येईल तो फ्किलर फ्री थ्रीडीमुळे. अनेक टीव्हींमध्ये थ्रीडी पाहताना चित्र हलत असल्याचा आभास होतो. त्यामुळे एकतर चित्राची स्पष्टता कमी होते आणि शिवाय ती हलती चित्रे तीही थ्रीडीमध्ये पाहिल्यामुळे खूप त्रासही होतो. या फ्किर फ्री तंत्रज्ञानामुळे तो त्रास सहज टाळता येईल.
याशिवाय याची दृश्यात्मकता वाढविण्यासाठी यामध्ये रंगसंगतीसाठी अधिक चांगल्या बाबींचा तांत्रित वापर करण्यात आला आहे. त्यामुळे रंगसंगती केवळ सुखद नाही तर ती वास्तवाच्या अधिक जवळ जाणारी पाहायला मिळते. याशिवाय युनिव्हर्सल प्लग अ‍ॅण्ड प्ले, फाइल शेअरिंग, १० बॅण्ड ग्राफिक इक्विलायझर आदींची सोय यामध्ये देण्यात आली आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. २ लाखाच्या पुढे.

एओसी  एलइ१९ए १३३१/६१
पूर्वीचा टीव्ही आणि आताचा यात जमीन- अस्मानाचे अंतर आहे. पूर्वी टीव्ही विकत घेताना तो कसा दिसतो म्हणजेच त्याचे बाह्य़रूप आणि अंतरूप म्हणजेच त्याचे रंग कसे दिसतात, एवढेच पाहिले जायचे. मात्र आता तसे राहिलेले नाही. सर्वानाच आता स्मार्टफोनप्रमाणे आपला टीव्हीदेखील स्मार्ट असलेलाच लागतो. त्यामुळे मग यास्मार्ट टीव्हीसाठी वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या जातात. अर्थात त्यात किंमत हा घटक महत्त्वाचा असतोच.
पूर्वी केवळ मोठय़ा ब्रॅण्डकडे वळण्याचाच लोकांचा कल होता. पण आता मात्र काही इतर चांगली फीचर्स मिळाल्यास ग्राहक वेगळे ब्रॅण्डनेमही पसंत करतात. याचाच फायदा एओसीला झाला असून त्यांच्या मागणीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.
एओसीने आता १९ इंच स्क्रीन असलेले एलइ१९ए १३३१/६१ हे नवे मॉडेल बाजारात आणले आहे. याचे वैशिष्टय़ म्हणजे ड्रीम सराऊंड साऊंड आणि रीअल कलर इंजीन. या दोन्ही वैशिष्टय़ांमुळे यातील रंग आणि त्याची श्राव्यता या दोन्हींमध्ये चांगला गुणवत्तापूर्ण फरक झालेला दिसतो. म्हणूनच चांगला रंगीतसंगीत टीव्ही अशी त्याची नवीन ओळख झाली आहे.
आताच्या स्मार्ट टीव्हीप्रमाणे याला तुमच्या पीसीशी जोडण्यासाठी एचडीएमआय पोर्टची सोय देण्यात आली आहे. त्यामुळे हाय- डेफिनेशन कंटेंट तुम्ही यावर सहज पाहू शकता. शिवाय याला थेट यूएसबी प्लेबॅकची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या पेनड्राइव्हमधील संगीतही ऐकू शकता आणि सिनेमाही थेट पाहू शकता.
भारतीय बाजारपेठेतील किंमत  रु. ९,९९०/-

सोनीचे स्टायलिश इअरफोन  
सोनीने गेल्या काही वर्षांपासून त्यांचा ग्राहकवर्ग निश्चित केला आहे. त्यांचे लक्ष पूर्णपणे तरुणाईवर केंद्रित आहे. त्यामुळे त्यांना काय आवडेल आणि काय नाही, याचा अंदाज घेत ते अनेक उत्पादने बाजारपेठेत आणतात. त्यातही नर्म आकर्षक रंगसंगतीला ते प्राधान्य देतात.
सोनीने आता स्टायलिश इअरफोन बाजारातच आणले आहेत. गुलाबी रंगाचे हे इअरफोन तरुणींना नक्कीच आवडतील, असे आहेत. त्यावर फुलांची नक्षी असून त्यात स्वरोव्हस्की झिर्कोनिआचे खडे बसविण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांमध्ये उत्पादने तर स्मार्ट होतच आहेत. पण त्यांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तीच वेअरेबल उत्पादने अधिक देखणी होत आहेत. सोनीचे हे इअरफोन हे त्याचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. हे अँगल्ड इअरबड असून सोनीच्या इअरफोनचे महत्त्वाचे वैशिष््टय़ म्हणजे त्यांच्या सुश्राव्यतेमध्ये इतरांच्या तुलनेत गुणवत्तापूर्ण फरक जाणवतो. त्यातही तुम्हाला आता देखणेपण मिळत असेल तर मग सोन्याला सुगंधच
भारतीय बाजारपेटेतील किंमत : रु. १,४९०/-