• मला व्हॉट्सअ‍ॅपवरील काही महत्त्वाचे डेटा आणि फोटो सेव्ह करायचे असतील तर ते कुठे आणि कसे सेव्ह करू?

         – पूर्णिमा शेंडे, चेंबूर

  • व्हॉट्सअ‍ॅपवरील महत्त्वाचे संदेश किंवा फोटो सेव्ह करणे आता आणखी सोपे झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या आवृत्तीमध्ये संदेश किंवा छायाचित्र साठवून ठेवण्यासाठी ते फेव्हरेट करण्याची सोय करण्यात आली आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे तो संदेश किंवा छायाचित्र निवडून वर असलेला चांदणीचा पर्याय निवडला तर तुमचा तो संदेश सेव्ह होतो. तुम्ही इतर सर्व संदेश डीलीट केले तरी तो संदेश कायम राहतो.
  • विंडोज8.1 मोबाइलला ओटीजी केबलने पेनड्राइव्ह जोडता येतो का? त्यासाठी काही अपडेट घ्यावी लागतात का? नवीन विंडोज 10 मध्ये ही सुविधा आहे का?

          – सागर भोसले

  • विंडोज8.1 मध्ये ओटीजी केबलने पेनड्राइव्ह जोडण्याची सुविधा ओएस बाजारात आल्यानंतर सुरू करण्यात आली. त्या फोनवर तुम्हाला ही सुविधा वापरायची असेल तर तुम्हाला बिंग सर्चमध्ये जाऊन यूएसबी असे सर्च करावे लागेल. ते केल्यानंतर येणाऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला यूएसबीच्या सेटिंग्ज दिसतील त्यानुसार तुम्ही पेनड्राइव्ह जोडू शकता. याचबरोबर विंडोज10 मध्ये ओटीजी जोडणी सोप्या पद्धतीने देण्यात आली आहे. त्यासाठी कोणत्याही वेगळय़ा गोष्टीची गरज पडत नाही. तुम्ही ओटीजी केबलद्वारे पेनड्राइव्ह जोडला की तुम्हाला गॅलरीमध्ये पेनड्राइव्ह जोडलेला दिसेल.