पालघरमधील सातवलीमधून दहशतवादविरोधी पथकाने १५ किलो स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. मुंबई आणि ठाण्यातील दहशतवादविरोधी पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत जिलेटिनच्या कांड्यांचा साठा पोलिसांच्या हाती लागला.

एका गोदामात स्फोटकांचा साठा असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती. ही माहिती मिळताच पथकाने तातडीने कारवाई केली. त्यावेळी गोदामाच्या जमिनीखाली लपवून ठेवण्यात आलेला साठा दहशतवादविरोधी पथकाच्या दृष्टीस पडला. हा साठा नेमका कोणत्या कारणासाठी या ठिकाणी आणण्यात आला होता, याचा तपास सध्या दहशतवादविरोधी पथकाकडून सुरू आहे.