सायबेरियन हस्की
१९ २५ साली सायबेरिया देशातील एका गावात विशिष्ट आजाराची साथ आली आणि गावातील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणाहून लसीकरणासाठी लस हवी होती. मात्र बर्फाळ प्रदेशातील हा पल्ला इतका लांब होता की, मनुष्य पायी जाऊन हे अंतर पार करू शकत नव्हता. प्रतिकूल परिस्थितीत बर्फाळ प्रदेशातील जवळपास ६०० मैल एवढे अंतर कापून गावातील नागरिकांना लस पोहचवून शेकडो जणांचे प्राण वाचवण्याचे काम कुत्र्याच्या एका प्रजातीने केले. त्या प्रजातीचे नाव होते सायबेरिअन हस्की. या प्रजातीची उपयुक्तता समजल्यानंतर स्थानिकांत त्याचे महत्त्व वाढू लागले.या ब्रीडचे मूळ सायबेरिया देशातच आहे. मात्र १९२५ ते १९३० या कालावधीत या ब्रीडला अमेरिकेमध्ये मान्यता मिळाली. यानंतर हे ब्रीड अधिक विकसित करण्याचा प्रयत्न झाला आणि तेथून ‘सायबेरिअन हस्की’चा प्रसार झाला.

कळपात राहण्याची सवय
बर्फाळ प्रदेशात राहणारे रेनडिअर प्राणी आणि त्यांच्यासोबत राहणारे हे कुत्र्याचे ब्रीड अशी सायबेरिअन ब्रीडची ओळख निर्माण झाली. सायबेरिअन हस्की हे कुत्र्याचे ब्रीड सायबेरियामध्ये बहुतांश वेळा कळपामध्ये पाहायला मिळते. कळपातील नेतृत्व करणारा कुत्रा पुढे आणि त्याच्या मागे चालणारे इतर असा कळप या कुत्र्यांचा असतो. त्यामुळे या ब्रीडला कायम एकजुटीने राहण्याची सवय असते.

How dangerous is excess sugar for children?
अतिरिक्त साखर लहान मुलांसाठी किती धोकादायक? ‘हेल्दी ड्रिंक्स’ म्हणून जाहिरात करण्यास केंद्र सरकारने का केली मनाई?
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

लांबचा प्रवास नि सामानाची देवाणघेवाण..
सायबेरिअन हस्की हे ब्रीड मुळात सामानाची देवाणघेवाण करण्यासाठी ओळखले जाते. सायबेरिया देशातील बर्फाळ प्रदेशात लांबचा पल्ला हे ब्रीड सहज गाठू शकतात. सायबेरियामध्ये सामानाची देवाणघेवाण करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. या कुत्र्यांचा कळप आणि त्यांना पट्टय़ाने जोडलेल्या गाडीत सामान ठेवले जाते. एवढेच नाही तर सामानासोबत एक मनुष्य गाडीत असतो. सामान आणि मनुष्याच्या प्रवासासाठी सायबेरिअन हस्की या ब्रीडचा उपयोग होतो. याच्याशिवाय या प्रदेशातील सामानाची देवाणघेवाण पूर्ण होऊच शकत नाही. साधारण दहा कुत्र्यांचा कळप एकत्र असल्यास ते दोनशे ते तीनशे किलोर्पयचे सामान वाहून नेऊ शकतात. म्हणूनच या ब्रीडची सतत काम हीच ओळख मानली जाते. सायबेरिअन हस्की यांना ‘वर्किंग डॉग’ म्हटले जाते. एका जागी शांत बसून राहणे त्यांना शक्य नाही. सतत काम करणे हा त्यांचा पेशा आहे.

मैत्रीचे नाते
सायबेरिअन हस्की हे ब्रीड मुळात कळपात राहणारे असल्याने एकमेकांच्या सहवासाची सवय त्यांना असते. त्यामुळे एकटे राहणे सहसा या ब्रीडला शक्य नसते. कायम आपल्या जवळच्या प्राण्यांशी, व्यक्तींशी ते मैत्री करण्यास उत्सुक असतात. आपल्या कळपात इतरांना सामावून घेतात किंवा इतरांच्या कळपामध्ये स्वत: सामील होतात. त्यामुळेच हे प्रेमळ ब्रीड म्हणून ओळखले जाते. दिसायला हे कुत्रे आकर्षक असल्याने या ब्रीडशी पटकन नाते तयार होते.

देखणेपण आणि शारीरिक जपणूक
सायबेरिअन हस्की हे दिसायला गोंडस असतात. स्वभाव मैत्रीचा असल्याने आपण पटकन या ब्रीडशी जुळवून घेऊ शकतो. कोणत्याही डॉग शोजमध्ये उत्कृष्ट सात किंवा चार यामध्ये सायबेरिअन हस्की हे ब्रीड असते. कारण ते दिसायला आकर्षक असतात. पांढरा हा मूळ रंग आणि त्यावर काळा, चॉकलेटी असे रंग या ब्रीडचे पाहायला मिळतात. बर्फाळ प्रदेशातील हे ब्रीड असल्याने त्यांच्या संपूर्ण शरीरावर के स असतात. या ब्रीडचे कोट जाड असल्याने त्यांची काळजी घ्यावी लागते. केस गळणे खूप प्रमाणात असल्याने सतत ग्रुमिंग या ब्रीडचे करावे लागते. दर सहा महिन्यांनी जुने केस जाऊन नवीन केस या ब्रीडच्या शरीरावर येत असतात. जास्त उष्ण प्रदेशात हे ब्रीड सहसा राहू शकत नाही. दिवसभरात काही काळ यांना थंड हवेची आवश्यकता असते. आहारामध्ये या ब्रीडला कच्चे मांस उपयुक्त ठरते. मात्र आता तयार खाद्यपदार्थाशी या ब्रीडने जुळवून घेतले आहे.

विसरण्याच्या वृत्तीमुळे प्रशिक्षण कमी
हे ब्रीड प्रशिक्षणासाठी उपयुक्त नाही. प्रशिक्षण दिल्यावर विसरण्याची सवय जास्त असते. त्यांना सतत आठवण करून द्यावी लागते. एखाद्याला इजा करणे, भुंकणे असा स्वभाव नसल्याने राखणदारीसाठी उपयुक्त नसले तरी घरात हौस म्हणून पाळण्यासाठी हे ब्रीड उपयुक्त आहेत. भारतामध्ये बेंगलोर येथे यशोधरा हेमचंद्रा यांनी सायबेरिअन हस्की यांचे उत्कृष्ट ब्रीिडग केलेले आहे. मोठय़ा प्रमाणात याचे ब्रीडिंग होत नसल्याने साधारण तीस हजारापासून हे ब्रीड बाजारात उपलब्ध असते.